नांदेड - मध्य रेल्वे, मुंबई विभागातील दोन रेल्वे स्थानकावर रेल्वे भुयारी पुलाकरिता आणि एका रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे. खडवली आणि वसिंद रेल्वे स्थानकामधील लेवेल क्रोसिंग क्र. ६१ वर आणि आसनगाव ते आडगाव रेल्वे स्थानकादरम्यान लेवेल क्रोसिंग क्र. ६८ वर भुयारी पुला करिता आर. एच. गर्डर टाकण्यात येणार आहे. तसेच कल्याण-कसारा सेक्शनमध्ये शहाद रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे, याकरिता रेल्वे ब्लॉक घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेने कळविल्यानुसार नांदेड विभागातील मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या राज्यावरील ग्रहणाला वर्ष पूर्ण; दुसरी लाट थोपविण्याचे आव्हान
रद्द झालेल्या रेल्वे पुढीलप्रमाणे -
१) ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते आदिलाबाद दि. १२.०३.२०२१ रोजीची रेल्वे पूर्णतः रद्द
२) ०११४२ आदिलाबाद ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दि. १३.०३.२०२१ रोजीची रेल्वे पूर्णतः रद्द.
३) ०७०५८ सिकंदराबाद ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दि. १३.०३.२०२१ रोजीची रेल्वे पूर्णतः रद्द.
४) ०७०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सिकंदराबाद दि. १४.०३.२०२१ रोजीची रेल्वे पूर्णतः रद्द
५) ०७६१७ नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दि. १३.०३.२०२१ रोजीची रेल्वे पूर्णतः रद्द.
६) ०७६१८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नांदेड दि. १४.०३.२०२१ रोजीची रेल्वे पूर्णतः रद्द.
हेही वाचा - पुण्यात केक कापून कोरोनाचा पहिला वाढदिवस साजरा