नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 844 अहवालापैकी 183 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 87 तर अँटिजेन तपासणीद्वारे 96 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 217 एवढी झाली असून यातील 85 हजार 419 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 451 रुग्ण उपचार घेत असून 48 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.
पाच जणांचा मृत्यू -
28 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा, भोकर तालुक्यातील बेंबर येथील 65 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील देगाव येथील 50 वर्षाचा पुरुष तसेच 29 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 40 वर्षाच्या एका महिलेचा आश्विनी कोविड रुग्णालय, आसरानगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 880 एवढी आहे.
1 हजार 451 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 1 हजार 451 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 41, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 25, बारड कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 22, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 3, भोकर कोविड केअर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 5, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 8, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 3, बिलोली कोविड केअर सेंटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, एनआरआय कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 13, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 812, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 320, खाजगी रुग्णालय 108 व्यक्ती उपचार घेत आहेत.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 117, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 109, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 39 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविडबाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 34 हजार 100
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 34 हजार 21
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 217
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 85 हजार 419
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 880
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.74 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-187
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 451
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-48