ETV Bharat / state

नांदेड जिल्हा न्यायालयाने लाचखोर जमादाराला सुनावली अडीच वर्ष सक्तमजुरी - अंतरिम जामीन

अंतरिम जामीन मंजूर करायची असेल तर तपास अधिकारी असल्याने माझे मत महत्त्वाचे असल्याचे सहाय्य पोलीस उपनिरिक्षरांनी सांगितले. मात्र, त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने नांदेड लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून एसीबी पथकाने शेखला रंगेहाथ पकडले होते. तसेच एसीबीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाची सुनावणी बुधवारी घेण्यात आली.

नांदेड जिल्हा न्यायालय
author img

By

Published : Jun 20, 2019, 10:55 AM IST

नांदेड - आरोपीच्या जामीन सुनावणीत अनुकुल मत सादर करण्यासाठी लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अडीच वर्ष सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शेख अख्तर मो.हनीफ असे आरोपीचे नाव असून तो सिंदखेड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. प्रथम जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात आली.

नांदेड जिल्हा न्यायालय

माहूर तालुक्यातील सावरखेड येथील प्रवीण किशन महल्ले आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांविरुध्द एका प्रकरणात १२ डिसेंबर २०१३ ला सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख हनीफ करत होते. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली असता प्रवीण व अन्य आरोपींचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला. त्यामुळे प्रवीणने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्याठिकाणी त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला होता. त्याची मुदत ११ फेब्रुवारी २०१४ पर्यंत होती. त्यामुळे तो ३१ जानेवारी २०१४ पर्यंत सिंदखेड पोलीस ठाण्यात नियमित हजेरी देऊ लागला. मात्र, एका हजेरीला शेख हनीफची भेट झाली नाही. त्यामुळे १ फेब्रुवारी २०१४ ला शेख किनवटला प्रवीणच्या घरी गेला. तसेच २ मार्चला तुम्ही किनवटला या, असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे प्रवीण आणि त्याचा मित्र शेखकडे गेले. त्यावेळी तुमची अंतरिम जामीन मंजूर करायची असेल तर तपास अधिकारी असल्याने माझे मत महत्त्वाचे असल्याचे शेखने सांगितले. मात्र, त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर प्रवीणने नांदेड लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून एसीबी पथकाने शेखला रंगेहाथ पकडले होते. तसेच एसीबीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाची सुनावणी बुधवारी घेण्यात आली. यामध्ये आरोपी शेखला अडीच वर्ष सक्त मजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.

Intro:नांदेड - लाचखोर जमदाराला अडीच वर्षे सक्तमजुरी.

नांदेड : एका प्रकरणात आरोपीच्या जामीन सुनावणीत अनुकुल म्हणे सादर करण्यासाठी २५ हजारांची लाच घेणा-या सिंदखेड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थात जमादार शेख अख्तर मो.हनीफ याला एकूण अडीच वर्षे सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा नांदेडचे प्रथम जिल्हा न्यायाधीश एस.एस.खरात यांनी सुनावली आहे.Body:माहूर तालुक्यातील सावरखेड येथील प्रवीण किशन महल्ले व त्याच्या पाच सहका-यांविरुध्द १२ डिसेंबर १३ रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुरनं ५१/२०१३ कलम ४२०,४१७, ४१९,४६३, ४६७,४१८, ४७१, ४०९,
३४, १२० (ब) दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन बीट जमादार शेख अख्तर मो.हनीफ यांच्याकडे आला.नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने प्रवीण व अन्य आरोपींचा जामीन नामंजूर केला. त्यामुळे महल्लेने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.तेथे त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला होता.त्याची मुदत ११ फेब्रुवारी १४ पर्यंत होती.त्यामुळे ३१ जानेवारी १४ पर्यंत सिंदखेड पोलिस ठाण्यात जाऊन नियमित हजेरी देऊ लागला.परंतु एका हजेरीला एएसआय शेख अख्तर यांची भेट झाली नाही त्यामुळे १ फेब्रुवारी १४ रोजी शेख महल्लेच्या घरी गेले आणि २ मार्च १४ रोजी तुम्ही किनवटला या,तेथे बोलू म्हणाले.त्यानुसार महल्ले व त्याचा मित्र दीपका किनवटला शेखकडे गेले होते.त्यावेळी शेखने तुमची अंतिम जामीन मंजूर करायची ? असेल तर तपास अधिकारी असल्याने माझे म्हणणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी त्यांनी २५ हजार रुपये मागितले. एवढेच नव्हे तर २५ हजार रुपये द्यावेत लागतील, पैकी २० हजार आता द्या व उरलेले नंतर द्या असेही तो म्हणाला.त्यावेळी माझ्याकडे फक्त १४ हजार रुपये आहेत,असे महल्लेने सांगितल्यावर त्याने ते घेतले. नंतर ८ फेब्रुवारी १४ रोजी वाई बाजारमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात उर्वरित ११ हजार रुपये घेऊन या,असे शेख म्हणाल्याचे प्रवीणने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर प्रवीणने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधून तक्रार दिली.त्यानुसार वाईबाजारमध्ये ८ फेब्रुवारी १४ रोजी सापळा रचण्यात आला.त्या दिवशी ११ हजार रुपये शेखने स्वीकारल्यानंतर एसीबी पथकाने रंगेहाथ त्याला पकडले.Conclusion:
या प्रकरणी एसीबी पथकाने कलम १३(१)(ड),१३ (२) नुसार शेखविरुध्द गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास करुन नांदेडचे प्रथम जिल्हा न्यायाधीश एस.एस.खरात यांच्यासमोर खटला चालला. चार साक्षीदार तपासून न्या.खरात यांनी
दोषी जमादार शेख अख्तर विविध कलमान्वये
एकूण अडीच वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली.या शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत.या
प्रकरणात सरकारतफे सहाय्यक सरकारी वकील रणजित देशमुख यांनी काम पाहिले.एसीबीचे अधिकारी संजय लाठकर,विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून कपिल शेळके, पोहे का.सुधीर खोडवे, मिलिंद बोडके, जयराम विलदगावे, दिलीपसिंध मल्ली यांनी मदत केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.