नांदेड - रेती माफियांवर वचक बसविण्यासाठी नदीकाठी असलेले रेती उपसा करणारे तराफे जाळण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी केली आहे. तसेच अवैधरित्या काढलेल्या रेतीचा मोठा साठा प्रशासनाने जप्त केला आहे.
नांदेड शहराच्या शेजारी असलेल्या गोदावरी नदीकाठावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनातील कर्मचारी हजर होते. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्रच रेतीची अवैध तस्करी सुरू आहे. ती रोखण्यासाठी प्रशासनाने जागोजागी नाकेबंदी केली आहे. मात्र, तरीही काही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने रेती तस्करी सुरूच असल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद