ETV Bharat / state

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 'या' संकेतस्थळावर भरता येणार नामनिर्देशन पत्र

जिल्ह्यात 1 हजार 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबर 2020 (25, 26 व 27 डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळून) या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहेत.

Gram Panchayat Election Nanded
जिल्हाधिकारी
author img

By

Published : Dec 24, 2020, 10:49 PM IST

नांदेड - जिल्ह्यात 1 हजार 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबर 2020 (25, 26 व 27 डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळून) या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहेत. हे नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या http://panchayatelection.mah.gov.in या संकेतस्थळावर भरून नामनिर्देशन पत्राची प्रिंट काढल्यानंतर आवश्यक त्याठिकाणी स्वाक्षरी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे घोषणापत्र आवश्यक...

नामनिर्देशन पत्रासोबत आवश्यक कागदपत्रासह http://panchayatelection.mah.gov.in या संकेतस्थळावर भरलेले गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे घोषणापत्र आणि मत्ता व दायित्वबाबतचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. या नामनिर्देशन पत्रासोबत पोलीस विभागाच्या चारित्र्य पडताळणी अहवालाची आवश्यकता राहाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी सांगितले.

हेही वाचा - विशेष : रेल्वेच्या नांदेड विभागातील बनविलेल्या 'बोगी' वापराची शक्यता धूसर..!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.