ETV Bharat / state

भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण महत्वाचे - जिल्हाधिकारी इटनकर - corona vaccination in nanded

लोकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केलं.

collector on corona vaccination
भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण महत्वाचे - जिल्हाधिकारी इटनकर
author img

By

Published : May 6, 2021, 10:18 PM IST

नांदेड - जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट हळूवारपणे कमी-कमी होत चालली आहे. मात्र, भविष्यातील कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. यासाठी कोविड आजारासह लसीकरण साक्षरता महत्वाची असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

आरोग्य साक्षरतेसाठी डिजीटल मोबाईल व्हॅन
नागरिकांमध्ये आरोग्य साक्षरतेसाठी आरोग्य विभागातर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रसिद्धी मोहिमेच्या कोविड-19 लसीकरण जनजागृती एलईडी मोबाईल डिजीटल व्हॅनला त्यांनी हिरवी झेंडी दाखवून आज रवाना केले.

कोरोना व लसीकरणविषयी तालुकानिहाय चित्ररथाद्वारे जनजागृती
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय व शहरी आरोग्य अभियानच्या माध्यमातून नांदेड शहर, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अंतर्गत जिल्ह्यातील वेगवेगळया तालुक्यांच्या ठिकाणी कोरोना लसीकरण विषयक जनजागृती विषयक माहिती चित्ररथाव्दारे दिली दिली जाणार आहे.

कोरोना आजार थोपविण्याची लसीमध्ये क्षमता
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, लोकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. लसीकरणाचे होणारे फायदे म्हणजे भविष्यात कोरोना झाला तरी त्याचा आरोग्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे आपण सामान्यपणे हा आजार थोपवू शकतो, इतकी क्षमता शासनाने निर्माण केलेल्या लसीमध्ये आहे. शासनाने निर्देशीत केलेल्या नियमानुसार नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

लसीकरणासाठी प्रशासनाचे लक्ष्य केंद्रीत
कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी लसीकरण करणे, यावर आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी लोकांमध्ये लसीकरणाचे महत्च याबाबत जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी लसीकरणाचा प्रसार केला जाणार असल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

यावेळी यांची होती उपस्थिती
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशी, जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.