नांदेड- शहर वि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह इतर आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
संचारबंदी काळात वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जगू नये,त्यांना मुक्तसंचार करता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शक्यता कामाशिवाय घराच्या बाहेर पडु नये, व गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावल्याशिवाय थांबू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.