ETV Bharat / state

Nanded Banana Price : नांदेडच्या केळींना मिळाला विक्रमी भाव, शेतकरी सुखावला

सुप्रसिध्द अश्या नांदेडच्या केळीला (Nanded Banana) यंदा विक्रमी भाव (Nanded bananas fetch record prices) मिळाल्याने, शेतकअऱयांच्या (Farmers) आनंदाला पारावार उरला नाही. स्थानिक बाजारात केळीला तब्बल २००० ते २२०० रूपये प्रति क्विंटलाचा विक्रमी भाव मिळत आहे.

Nanded bananas
नांदेडच्या केळीं
author img

By

Published : Jul 6, 2022, 4:12 PM IST

नांदेड : केळी (Nanded Banana) उत्पादनात राज्यात जळगावनंतर नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो. नांदेडमधल्या अर्धापूरच्या केळीला महाराष्ट्रतच नव्हे तर संपूर्ण देशात, परदेशातही मागणी आहे. दरम्यान यंदा पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने सध्या स्थानिक बाजारात केळीला तब्बल २००० ते २२०० रूपये प्रति क्विंटलाचा विक्रमी भाव (Nanded bananas fetch record prices) मिळत आहे. स्थानिक बाजारातच विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. तसेचं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देखील पाहायला मिळत आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक ऐतिहासिक दर असल्याचं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmers) सांगितले. बाहेर देशात निर्यात झाल्यास आणखी दरवाढ होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

चार तालुक्यातील १५ हजार हेक्टरवर केळीची लागवड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, भोकर आणि मुदखेड या तालुक्यात केली जाते. प्रामुख्याने केळी पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. केळी पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने केळी कापून फेकून देण्याची वेळ आली होती. तसेच मध्यंतरी वादळी वऱ्यामुळे मध्यप्रेदश, बऱ्हाणपुर, जळगाव, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात केळीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे लागवडीच्या क्षेत्रातही घट झाली होती. मागील तीन वर्षात केळी उत्पादकांना सतत संकटना तोंड द्यावे लागले. सध्या मागणी वाढली असून त्या तुलनेत उत्पादन नसल्याने केळीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. क्विंटलाला २००० ते २२०० रूपये इतका विक्रमी भाव आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला आहे. केळीचा एका घड २५० ते ३०० रुपयाला विकला जात आहे. यापूर्वी १८०० रूपये क्विंटलाला दर मिळाला होता. त्यापुढे दर कधीच गेला नव्हता. असं स्थानिक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

अर्धापुरीची केळी चविष्ट नांदेडमधील अर्धापुरी नावाची केळी देशभर प्रसिद्ध आहे. ही केळी चविष्ट आणि टिकाऊ आहे. किमान आठ दिवस केळी राहते. त्यामुळे अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, इराक, दुबई या देशांत येथील केळीची निर्यात होते.अर्धापूर परिसरातून देशभरात केळीची मोठी मागणी असते. सध्या फक्त देशाअंतर्गत भागातच केळी पाठवली जात आहे. तरी केळीला क्विंटलाला २००० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. भाविष्यात बाहेर देशात निर्यात झाल्यावर आणखी दर वाढ होण्याची शक्यता आहे. अशी आशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

हेही वाचा : Windfall Tax : तेल कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्समधून सरकारला $12 अब्ज मिळतील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.