ETV Bharat / state

नांदेड-अमृतसर विमानसेवा आता दिल्लीपर्यंत; 19 डिसेंबर पासून सुरुवात - air india flight booking

कोरोनाचे सावट कमी झाल्याने केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरू केली. त्यानुसार एअर इंडियानेही नांदेड-अमृतसर सेवा पुन्हा सुरू केली होती. ती आठवड्यातून तीन दिवस नियमित सुरू होती. या सेवेचा विस्तार करून ती दिल्लीपर्यंत सुरू केली आहे.

एअर इंडिया विमानसेवा
एअर इंडिया विमानसेवा
author img

By

Published : Dec 18, 2020, 4:58 PM IST

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली एअर इंडियाची विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सुरवातीला नांदेड-अमृतसर अशी सेवा सुरू केली होती. परंतु, प्रवाशांच्या मागणीनुसार आता तिचा विस्तार करीत पुढे दिल्लीपर्यंत करण्यात आली आहे. ही सेवा १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून नोंदणी सुरू झाल्याची माहिती येथील स्टेशन मॅनेजर गजेंद्र गुठे यांनी दिली.

कोरोनामुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली होती-

कोरोनापूर्वी नांदेड-अमृतसर, नांदेड दिल्ली आणि नांदेड - चंदीगड अशी एअर इंडियाची सेवा सुरू होती. कोरोनामुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यात या तिन्ही सेवा बंद होत्या. कोरोनाचे सावट कमी झाल्याने केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरू केली.
त्यानुसार एअर इंडियानेही नांदेड-अमृतसर सेवा पुन्हा सुरू केली होती. ती आठवड्यातून तीन दिवस नियमित सुरू होती. या सेवेचा विस्तार करून ती दिल्लीपर्यंत सुरू केली आहे. त्यामुळे नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या शीख भाविकांसह अन्य प्रवाशांची सोय झाली आहे.

अशी असेल विमानसेवा-

विमान दिल्ली येथून १९ डिसेंबरला पहाटे सहाला उड्डाण घेईल. अमृतसरला सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पोहचेल. तेथून आठ वाजून दहा मिनिटांनी उड्डाण घेत नांदेडला ते पावणे अकराला पोहचेल. नांदेडहून पावणेबाराला उड्डाण घेऊन दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी अमृतसरला पोहचेल. तीन वाजून वीस मिनिटांनी अमृतसरहून उड्डाण घेवून दुपारी साडेचारला दिल्लीत पोहचेल.

मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सेवा सुरू राहील-

ही सेवा मंगळवार, बुधवार, शनिवारी सुरू राहील. सुरुवातीचे भाडे दिल्ली ते नांदेड हे तीन हजार ९५६ रुपये असेल. कोरोना नियमांचे पालन करून १६२ आसन क्षमता असलेल्या या विमानसेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुठे यांनी केले आहे.

हेही वाचा- धक्कादायक! आर्थिक गुन्ह्यांच्या 63 टक्के प्रकरणात कुठलीच चौकशी नाही

हेही वाचा- आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन : कोरोना काळात भारतातील स्थलांतरितांचे प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.