नांदेड - जिल्ह्यात बुधवारी 1 हजार 664 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर मागील चार दिवसात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७०१ तर अँटिजेन तपासणीद्वारे ९६३ अहवाल बाधित आहेत. एकूण बाधितांची संख्या ६१ हजार ७२ एवढी झाली असून यातील ४६ हजार ५७८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार १०७ रुग्ण उपचार घेत असून २०४ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार १३० एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.२६ टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 10 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब - ३ लाख ८६ हजार ७५६
एकुण निगेटिव्ह स्वॅब - ३ लाख १८ हजार १३४
आजवर एकूण बाधित व्यक्ती - ६१ हजार ७२
आजवर बरे झाले एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - ४६ हजार ५७८
एकूण मृत्यू संख्या - १ हजार १३०
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.२६ टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - १७
आज (बुधवारी) स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - ३७
आज (बुधवारी) प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ३७८
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - १३ हजार १०७
आज (बुधवारी) रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - २०४