ETV Bharat / state

नांदेडच्या सांगवी परीसरात पूर्व वैमनस्यातून एकाचा खून; तीन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात... - Nanded Police

नांदेडमधील सांगवी (अंबानगर) परिसरात असलेल्या गौतमनगर येथे तिघा जणांनी पूर्ववैमनस्यातून अनिल कांबळे या तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. दरम्यान, विमानतळ पोलीसांनी या प्रकरणात तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nanded Police
नांदेड पोलीस
author img

By

Published : Aug 11, 2020, 10:49 AM IST

नांदेड : गेल्या आठवडाभरापासून शहर व परिसरात गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. सोमवारी रात्री आठच्या सुमारास सांगवी (अंबानगर) परिसरात असलेल्या गौतमनगर येथे तिघा जणांनी पूर्ववैमनस्यातून अनिल कांबळे या तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. दरम्यान, विमानतळ पोलीसांनी या प्रकरणात तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार गौतमनगर येथील तरुण अनिल कांबळे याच्यावर सोमवारी (दि.१०) रात्री आठच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून तिघा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात अनिल कांबळेचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसातील शहर व परिसरातील खुनाची ही तिसरी घटना आहे. टोळी युद्धातून विक्की चव्हाणचा खून करण्यात आला, त्यानंतर खडकपूरा येथे तरुणाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच लोहा येथील एका मुलाचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. यात त्या गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला. त्या पाठोपाठ सोमवारी रात्री ही घटना घडली.

खुनाच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, विमानतळ पोलिसांनी गौतमनगर येथील खून प्रकरणात तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. खुनाच्या घटनेनंतर या परिसरात विमानतळ पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. एकूणच गुन्हेगारांचा मुक्त संचार आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिकांमध्ये दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हाणामारी तसेच खुनाच्या घटनांमध्ये शस्त्रांचा आणि गावठी पिस्तुलांचा सर्रास वापर केला जात आहे. यामुळे गावठी पिस्तुल व शस्त्रे गुन्हेगारांना सहजपणे उपलब्ध होत असल्याचे दिसून येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.