नांदेड- पती, पत्नी आणि प्रियसी अशा प्रेमाच्या त्रिकोणात पतीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नांदेडात घडली आहे. पत्नीला सोडून माझ्यासोबत राहा असा हट्ट धरत प्रियसी रोहिणीने भाऊ आणि मित्रांच्या मदतीने प्रियकराची हत्या केली आहे. आकाश लोकरे असं मृताचे नाव आहे. अंगावर शहारे आणणारा हत्येचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
एकतर्फी प्रेमातून झाली हत्या -
नांदेड शहरातील रोहिणी थोरात या तरुणीचे आणि आकाश लोकरे यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, प्रेमात ब्रेकअप झाल्यानंतर आकाशने मोनिका नावाच्या मुलीशी लग्न केले. आता आकाशला एकवर्षाची मुलगी आहे. रोहिणी आकाशपासून दूर राहायला तयार नव्हती आणि रोहिणीने आकाशला बायकोला सोडून माझ्यासोबत रहा असा तगादा लावला होता. मात्र आकाशला ते मान्य नव्हते. पत्नी आणि मुलाीला सोडणार नाही अशी भूमिका त्याने घेतली होती. त्यामुळे दबावाखाली असलेल्या रोहिणीने तिचे भाऊ आणि मित्रांच्या सहकार्याने आकाशला मारण्याचा कट रचला होता.
पत्नीला सोडण्यासाठी लावला होता तगादा-
आकाश हा आपली पत्नी मोनिका आणि मुलीला सोडून राहण्यास तयार नव्हता. त्यामुळे प्रियसी रोहिणीने भावाच्या आणि मित्रांच्या मदतीने मोनिका आणि आकाशवर दबाव आणला होता. पत्नी मोनिकाने घरातून बाहेर निघावं आणि आकाशला सोडून जावं असं रोहिणीचे मत होते. दरम्यान, आकाशची हत्या करण्यापूर्वी आकाशच्या आईवर देखील हल्ला केला होता. त्यासोबतच माहेरी राहायला गेलेल्या मोनिका आणि आकाशच्या सासुवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न रोहिणीने केला होता. यामध्ये मोनिका आणि तिची आई देखील भाजली होती.
निर्घृणपणे झाली हत्त्या-
नांदेड शहरातील आंबेडकर नगर येथील आकाश लोकरे याला त्याच्या राहत्या घरातून बाहेर काढण्यात आलं. अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र आगीने पेट घेतला नसल्याने त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. हा सर्व प्रकार खळबळजनक घटना 12 फेब्रुवारी च्या रात्री घडलीय. जखमी आकाशचा 14 फेब्रुवारीला व्हॅलनटाईन दिवशी मृत्यू झालाय. महत्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हत्या झालीय त्या ठिकाणाहून जवळापास पन्नास फुटाच्या अंतरावर पोलीस चौकी आहे इतकाच नाही तर तसेच पालक मंत्री अशोक चव्हाण यांचं घर देखील हाकेच्या अंतरावर आहे. तरी या परिसरात हत्या झाल्याने पोलीस नेमकं करताय काय प्रश्न निर्माण झाला.
शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
मृत्यू दरम्यान आकाशचा तलवार, चाकु आणि अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी आकाशला जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पोलिसांनी मृत्यु पूर्वी आकशचा जबाब आणि आईच्या तक्रारी वरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांच्या उपचार नंतर डॉक्टरांना आकाशला वाचवण्यात यश आलं नाही. आकाशच्या मारेकरी रोहिणी थोरातला पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रशांत थोरात, सतिष हटकर अन्य एक असे चार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.