नांदेड: पिता-पुत्राचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला सुऱ्याने भोसकून ( Youth stabbed to death in Nanded ) गंभीर जखमी केल्याने तरुणाचा मृत्यू झाला ( Nanded Youth Murder ) . ही घटना रामनगर नालागडा ( Murder in Ramnagar Nalagada ) भागात आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी १ वाजता घडली.
नाकावर सुऱ्याने वार- शहरातील रामनगर नालागडा भागातील तोडसाम कुटुंबातील दिलीप तोडसाम व त्यांचा मुलगा तिरुपती तोडसाम या पिता-पुत्रामध्ये आज दुपारी १२.४५ च्या सुमारास भांडण सुरू होते. भांडण सुरु असताना शेजारी राहाणारा भारत रामकिशन डोईफोडे हा विवाहित तरुण त्यांचे भांडण सोडवण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी गेले होता. तु आमच्या घरच्या भांडणात कशाला पडतोस म्हणून तिरुपती दिलीप तोडसाम या तरुणाने रागाच्या भरात भांडण सोडण्यासाठी आलेल्या भारत रामकिशन डोईफोडे या तरुणावर जबर हल्ला चढविला. त्याच्या नाकावर सुऱ्याने जबर वार केल्याने गंभीर दुःखापत झाल्याने त्यास तातडीने उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरने जखमी भारतला मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मृताच्या पत्नीची पोलिसात तक्रार- या प्रकरणी मयत भारत डोईफोडे यांच्या पत्नी शुंभागिनी भारत डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत भारत यास तीन मुली असल्याचे समजते. सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - Park Street Shootout : सीआयएसएफ जवानाने सहकाऱ्यांवर केला गोळीबार, 2 जखमी