ETV Bharat / state

मुंबई-किनवट-मुंबई विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबादपर्यंत...! - Mumbai-Kinwat-Mumbai Special Railway news

12 ऑक्टोबरपासून मुंबई-किनवट-मुंबई ही विशेष रेल्वे सुरू झाली आहे. ही विशेष गाडी नियमित रेल्वेसेवा सुरू होईपर्यंत धावणार आहे. प्रवाशांच्या सुविधेकरिता या विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबादपर्यंत करण्यात आला आहे.

नांदेड रेल्वे
नांदेड रेल्वे
author img

By

Published : Nov 13, 2020, 12:34 PM IST

नांदेड - दिवाळीत प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई-किनवट-मुंबई ही विशेष रेल्वे 12 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबादपर्यंत करण्यात आला आहे. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे, असे नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या गाडीच्या वेळा पुढीलप्रमाणे असतील...

गाडी संख्या 01141 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते आदिलाबाद, ही गाडी 13 नोव्हेंबरपासून मुंबईहून रोज सायंकाळी 04.35 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड, किनवट मार्गे आदिलाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता पोहचेल.

गाडी संख्या 01142 हुजूर - साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ही गाडी 14 नोव्हेंबरपासून आदिलाबादहून रोज दुपारी 01.00 वाजता सुटेल आणि किनवट, हुजूर साहेब नांदेड, औरंगाबाद-मनमाडमार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 05.35 वाजता पोहोचेल. ही गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा , हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्रकुंड, बोधडी बुज्रुग, किनवट येथे थांबेल. या गाडीस एकूण 18 डबे असतील.

कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक -

गाडीत वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल. ही विशेष गाडी नियमित रेल्वेसेवा सुरू होईपर्यंतच असणार आहे. प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.