ETV Bharat / state

MP Pratap Patil Chikhlikar : खासदार प्रताप पाटील चिखलीकर पोहचले लोककलावंतांच्या फडात; केली आस्थेनं विचारपूस - माळेगावमधील यात्रा

नांदेडच्या माळेगावमधील यात्रेत लोक कलावंतांच्या फडावर ( folk artists in Malegaon In Nanded ) जाऊन खासदार प्रताप पाटील चिखलीकर ( MP Pratap Patil Chikhlikar in Malegaon In Nanded ) यांनी भेट घेतली. लोक कलावंतांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित मंडळींना दिल्या.

MP Pratap Patil Chikhlikar
प्रताप पाटील चिखलीकर
author img

By

Published : Dec 25, 2022, 6:26 PM IST

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडच्या माळेगावमधील यात्रेत भेट दिली

नांदेड : नांदेडच्या माळेगावमधील यात्रेत मोठ्या संख्येने लोककलावंत आपले तमाशा मंडळ घेऊन दाखल ( folk artists in Malegaon In Nanded ) झाले आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच हे लोककलावंत आपले कलाकार घेऊन यात्रेत दाखल झालेत.

खासदारांची लोककलावंतसोबत भेट : या लोक कलावंतांच्या फडावर जाऊन खासदार प्रताप पाटील चिखलीकर ( MP Pratap Patil Chikhlikar ) यांनी भेट घेतली. लोक कलावंतांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित मंडळींना दिल्या. यात्रा संस्कृतीत या लोक कलावंतांचे अनन्य साधारण महत्व आहे, ही कला आणि कलावंत टिकले पाहिजेत यासाठी त्यांना आपली मदत राहिली पाहिजे, असे प्रयत्न मी तीस वर्षांपासून करत असल्याचे खासदार प्रताप पाटील यांनी यावेळी सांगितले.

यात्रेचे खास वैशिष्ट्य : नांदेडची माळेगाव यात्रा म्हणजे गोरगरिबांचा हक्काची यात्रा म्हणून ओळखल्या जाते. या यात्रेत सर्वांसाठीच काहीतरी नाविन्यपूर्ण असते. गोरगरीब मजुरदार मंडळींना कामावर घालण्यासाठी येथे अत्यल्प भावात जुने कपडे मिळतात. अगदी दहा रुपयांपासून साडी इथे विक्रीला आहे तर पन्नास रुपयापासून पुरुषांचा ड्रेस इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. कष्ठकरी समाज हे कपडे विकत घेऊन वर्षभर गुजराण करत असतो. या गोरगरिबांना मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षे चांगले कपडे घालायला मिळाले नाहीत. मात्र आता यात्रा सुरू झाल्याने त्यांची गरज पूर्ण झाली आहे. माळेगांवच्या यात्रेतील कपड्यांचा हा बाजार गोरगरिबांसाठी एक प्रकारे शहरातील मॉल मध्ये लागलेल्या सेल पेक्षाही आकर्षक असाच असतो.

लोककलावंतांची उपेक्षा : माळेगाव यात्रेसाठी जि.प. प्रशासनाच्यावतीने लोककला महोत्सवासाठी कलांवत लावणीसाठी लावण्यवतींना निमंत्रीत केले आहे. या निमंत्रणाला मान देत कलावंतासह लावण्यसखी दाखल झाल्या आहेत. परंतु त्यांच्या नियोजनामध्ये जि. प. प्रशासनाकडून भेदभाव करण्यात आता असून लोककला महोत्सव आणि बारीसाठी आलेल्या कलावंतांना पालीतही राहायला जागा मिळेना. यापेक्षा लावण्यसखी मात्र सुखी या आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था नदिड शहरातील नामांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या दिमतीला अधिकाऱ्यांसह कर्मचारी आहेत. परंतु इकडे लोककलावंतांना मात्र कोणी विचारतही नाहीत, ही शोकांतिका असल्याचा आरोप केला जात आहे. कलावंत हा कलावंत परंतु जि.प. प्रशासनाने त्यांच्यात भेदभाव केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.