ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास ५ लाखाचा खासदार निधी देणार - हेमंत पाटील - ग्रामपंचायत निवडणूक बद्दल बातमी

हिंगोली लोकसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींनी निवडणूक बिनविरोध केल्यास ५ लाख खासदार निधी देण्याची घोषणा हेमंत पाटील यांनी केली आहे. दर पाच वर्षांनी निवडणुकीच्या दरम्यान होणारे भांडण तंटे, वाद या पासून गावाला मुक्त करण्याचा प्रामाणिक हेतू असून कोणतेही छुपे राजकारण यामध्ये नसल्याची भावना सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

MP Hemant Patil will give 5 lakh MP fund if Gram Panchayat elections are held without any objection
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास ५ लाखाचा खासदार निधी देणार - हेमंत पाटील
author img

By

Published : Dec 22, 2020, 10:27 PM IST

नांदेड - हिंगोली लोकसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींनी आगामी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासकामासाठी ५ लाख रुपयाचा खासदार निधी देण्यात येणार आहे. या बद्दलची घोषणा खासदार हेमंत पाटील यांनी केली.

गावागावात रंगली चर्चा -

ग्रामीण स्तरावरील मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या ग्राम पंचायत निवडणुकांचा बिगुल राज्यात वाजला असून धुरळा अन गुलाल उडविण्यासाठी सगळीकडे तारांबळ उडाली आहे. आमचे पॅनल, आमचा वार्ड वार्डातील रात्रीच्या बैठका, राखीव आणि आरक्षणानुसार सुटलेल्या जागा यावर गावागावात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हिंगोली मतदारसंघातील ११ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका -

कोरोना काळात शहरातून गावाकडे न येऊ देणाऱ्या गावकऱ्यांना आता गावातील पुढारी स्वतःच्या गाडीने गावाकडे घेऊन जात आहेत. यासर्व धामधुमीत गावातील हि निवडणूक खूपच प्रतिष्ठेची समजली जाते. यातही दरवेळी सामंजस्याने विचार करून गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक लढवून गावातील एकोपा कायम ठेवण्याचा प्रयन्त करत असतात. ही परंपरा कायम राहावी आणि प्रत्येक गावाचा विकास व्हावा या उद्देशाने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी असे आवाहन केले आहे. हिंगोली मतदार संघात येणाऱ्या ११ तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची आगामी निवडणूक आहे. या गावानी आपल्या गावची निवडणूक बिनविरोध करावी आणि गावच्या विकासासाठी ५ लक्ष रुपयाचा खासदार निधी घेऊन जावा. दर पाच वर्षांनी निवडणुकीच्या दरम्यान होणारे भांडण तंटे, वाद या पासून गावाला मुक्त करण्याचा प्रामाणिक हेतू असून कोणतेही छुपे राजकारण यामध्ये नसल्याची भावना सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

बिनविरोध साठी पाच लक्ष्य...!

आपल्या देशात दिल्लीच्या राजकारणापेक्षा गल्लीच्या राजकारणाला खूप महत्व दिले जाते. त्यामुळे सर्व जुने वाद तंटे यावेळी उफाळून येऊन गल्लीच्या राजकारणाला निवडणुकी व्यतिरिक्त वेगळाच रंग चढतो, त्यामुळे गाव सुखी तर देश सुखी यानुसार गावातील राजकारण जास्त न तापता एकोप्याने झाले पाहिजे असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . यामुळे आगामी काळात कोणती ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक लढवून गावाच्या विकासासाठी ५ लक्ष रुपयाचा खासदार निधी घेऊन जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.