ETV Bharat / state

'खबरदार! पीककर्जासाठी अडवणूक कराल तर...' - mp hemant patil warn to banks

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यामध्ये प्रशासन आणि राष्ट्रीयकृत बँकांची नेहमीच उदासीनता दिसून येते. त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पीककर्जापासून वंचित राहतो. परिणामी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते.

mp hemant patil
खासदार हेमंत पाटील
author img

By

Published : May 26, 2021, 9:18 PM IST

नांदेड - जर पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल, असा इशारा दम खासदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना दिला. खरीप पेरणी पूर्व हंगाम तोंडावर आलेला असताना सुद्धा अद्यापही हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाही. यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी पीककर्ज वाटपावर आक्रमक घेतली आहे.

शेतकरी पीककर्जापासून वंचित -

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यामध्ये प्रशासन आणि राष्ट्रीयकृत बँकांची नेहमीच उदासीनता दिसून येते. त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पीककर्जापासून वंचित राहतो. परिणामी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते. त्यामुळेच शेतकरी आणखी कर्जाच्या फेऱ्यात अडकतो. वेळेवर कर्ज वाटप न केल्याने पेरणी खोळंबते आणि परिणामी कर्जबाजारीपणा येतो. खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असताना अजूनही पीककर्ज वाटपासाठी बँक आणि प्रशासनाने पुढाकार घेतला नाही, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

हेही वाचा - ठाणे : शासनाची बंदी झुगारून बैलगाडी शर्यती; आयोजकांवर गुन्हा दाखल

जिल्हा बँका सोडली तर इतर बँकांचे उद्दिष्ट पूर्ण नाही -

ते म्हणाले की, पीककर्ज वाटपासाठी केवळ जिल्हा मध्यवर्ती बँका आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने काम करत आहेत. मात्र, जिल्ह्यात असलेल्या इतर राष्ट्रीयकृत बँका या केवळ व्यवसाय करत आहेत. त्यांना शेतकरी सर्व सामान्य जनता यांच्याशी काहीही देणेघेणे नाही, शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे उद्धटपणे बोलणे, बँकेत प्रवेश नाकारून अपमान करणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळेच बँकांनी वेळीच वागणुकीमध्ये बदल करावा, शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, कागदपत्रांसाठी अडणवूक करू नये, तसे न केल्यास शिवसेना स्टाईलने बँकांना उत्तर देण्यात येईल, असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारची 250 कोटींची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.