नांदेड - कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक लोकप्रतिनिधी सध्या घरातच बसून आहेत. मात्र, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे मतदारसंघात फिरून लोकांच्या अडचणी जाणून घेत आहेत.
तीर्थक्षेत्र माहूर येथे जाऊन खा.हेमंत पाटील यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला आहे. माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात खासदारांनी भेट देऊन तेथील औषध साठ्यातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या.
कोरोनासाठी येथे स्वतंत्र कक्षाच्या तयारीचा त्यांनी आढावादेखील घेतला आहे. तसेच गोरगरीब व गरजू लोकांना तातडीने धान्य उपलब्ध करून देण्याबाबत खासदार पाटील यांनी तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत.