ETV Bharat / state

धक्कादायक : आईकडूनच मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

नांदेडमध्ये शिक्षिकेवर हल्ला करुन एका मातेने स्वतःच्याच मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अन्य एका व्यक्तीच्या मदतीने मुलीच्या आईने हे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस.

mother tried to kidnap her daughter in Nanded
नांदेडमध्ये आईकडूनच मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Dec 20, 2019, 12:31 PM IST

नांदेड - जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. शाळेतील शिक्षिकेवर हल्ला करुन मातेने स्वतःच्या मुलीचे अन्य एकाच्या मदतीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. गुरुवार १९ डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास शहरातील शारदानगर भागात ही घटना घडली.

नांदेडमध्ये आईकडूनच मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न

हेही वाचा... बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट; जिजामाता बँकेनंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेला ८० लाखांचा गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरगुती वादामुळे पती-पत्नी विभक्त राहतात. त्यांना पाच वर्षाची मुलगी असून काही दिवसांपासून ही मुलगी वडिलांसोबत राहते. शारदानगर भागातील एका इंग्रजी माध्यम शाळेत ही मुलगी शिकत आहे. गुरुवारी सकाळी मुलगी रोजच्या प्रमाणे शाळेत गेली होती. दरम्यान तिची आई अन्य एका व्यक्तीला सोबत घेऊन शाळेत पोहोचली. त्यानंतर तिने मुलीला स्वतःसोबत घेऊन जायचे असल्याचे तेथील शिक्षिकेला सांगितले. त्यावर शिक्षिकेने मुलीचा ताबा पालकांच्या पूर्वसंमतीशिवाय देता येणार नसल्याचे सांगितले. मात्र मुलीच्या आईने शिक्षिकेवर हल्ला चढवत मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. शाळा व्यवस्थापनाने ही बाब मुलीच्या वडिलांना कळवली. मुलीचे पालक आल्यानंतर हा अपहरणाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी विमानतळ पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

हेही वाचा.... CAA विरोध: ऑगस्ट क्रांती मैदानावर जनसागर; मोदी सरकारविरोधात तीव्र संताप

Intro:नांदेड : मातेकडूनच मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न.

नांदेड : शिक्षिकेवर हल्ला करुन मातेने स्वतःच्या मुलीचे अन्य एकाच्या मदतीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला.ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी
साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास शहरातील शारदानगर भागात घडली.Body:
घरगुती वादामुळे पती-पत्नी विभक्त राहतात. त्यांना पाच वर्षाची मुलगी असून काही दिवसांपासून मुलगी
वडीलांसोबत राहते. सदरील मुलगी शारदानगर भागातील एका इंग्लिश स्कूलमध्ये शिकावयास आहे. गुरुवारी सकाळी ती चिमुकली रोजच्या प्रमाणे
शाळेत गेली होती. दरम्यान, मुलीची आई अन्य एका व्यक्तीस सोबत घेवून शाळेत पोहोचली. तिने मुलीला घेवून जाण्यासाठी आल्याचे शिक्षिकेला सांगितले. त्यावर शिक्षिकेने मुलीचा ताबा पालकांच्या पूर्वसंमतीशिवाय देता येणार नसल्याचे सांगितले.Conclusion:
यामुळे सदरील मुलीच्या आईने शिक्षिकेवर हल्ला
चढवत मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. शाळा व्यवस्थापनाने ही बाब पालकांना कळविली. दरम्यान,
हा वाद विमानतळ पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. याप्रकरणी विमानतळ पोलीस चौकशी करत आहेत. चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.