नांदेड - जिल्ह्यात आज एकूण 947 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 509 तर अँटिजेन तपासणीद्वारे 438 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 30 हजार 789 एवढी झाली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची संख्या 639
शुक्रवारी (19 मार्च 2021) गाडीपुरा नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, शनिवार (20 मार्च, 2021) गोनार (ता. कंधार) येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, वजिराबाद नांदेड येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा, मालेगाव रोड नांदेड येथील 76 वर्षाची एक महिला, मंगनपुरा नांदेड येथील 77 वर्षाची एक महिला, संचित नगर नांदेड येथील 75 वर्षाची एक महिला जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय नांदेड येथे , तर आझाद कॉलनी देगलूर येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा देगलूर कोविड रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 639 एवढी झाली आहे.
जिल्ह्यातील 4 हजार 770 सक्रिय रुग्ण
आजच्या 3 हजार 896 अहवालापैकी 2 हजार 723 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 30 हजार 789 एवढी झाली असून यातील 25 हजार 154 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 4 हजार 770 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 47 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
उपलब्ध खाटांची संख्या केवळ 30
सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय नांदेड येथे 20 एवढी आहे.
हेही वाचा - ‘स्वारातीम’ नांदेड विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन स्तरावरील क्लस्टर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल...!
हेही वाचा - अनोख्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि संदेश