नांदेड - वाढीव वीजबिलाविरोधात मुदखेड येथील वीजवितरण कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी अचानकपणे घुसून तोडफोड केली आहे. यावेळी मनसैनिकांकडून कार्यालयातील सामान आणि इतर साहित्यांची नासधूस करण्यात आली.
वीज बिल माफ करावे, अशी मागणी मनसेने केली असून या मागणीची दखल घेत नसल्याने कार्यालयाचे नुकसान केल्याचे मनसे कार्यकर्त्यानी सांगितले. तसेच हे आंदोलन सर्वत्र करणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. कोरोनाकाळात झालेल्या टाळेबंदीत तीन महिने वीजबिल आकारण्यात आले नव्हते. त्यानंतर एकदमच वीज बिल ग्राहकांना पाठवण्यात आले होते. हे वीजबिज जास्त असल्याने सर्व ग्राहकांनी वीजबिल कमी करा किंवा माफ करा, अशी मागणी केली होती. मात्र, वीजबिल कमी किंवा माफ केले नसल्याने मनसेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
हेही वाचा - परभणी-हैदराबाद विशेष रेल्वे १२ सप्टेंबरपासून सुरू