ETV Bharat / state

नांदेड लोकसभा : चिखलीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन - नांदेड लोकसभा

भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप युतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जुना मोंढा टॉवर येथून सकाळी ११ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली.

आमदार प्रताप पाटील चिखलीकर
author img

By

Published : Mar 26, 2019, 3:31 PM IST

Updated : Mar 26, 2019, 3:48 PM IST

नांदेड - नांदेड लोकसभेसाठी भाजपा-शिवसेना युतीच्यावतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर

भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप युतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जुना मोंढा टॉवर येथून सकाळी ११ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मध्यवर्ती पक्ष कार्यालय गोदावरी कॉम्प्लेक्स आयटीआय येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्य सरचिटणीस आमदार सुरजितसिंह ठाकूर, आमदार राम पाटील रातोळीकर आदी उपस्थित होते.

Intro:नांदेड लोकसभेसाठी भाजपा कडून आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा प्रचंड शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल....!Body:नांदेड लोकसभेसाठी भाजपा कडून आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा प्रचंड शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल....!

नांदेड: नांदेड लोकसभेसाठी भाजपा-शिवसेना युतीच्या वतीने आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचंड शक्तीप्रदर्शन करत चिखलीकर यांचा अर्ज दाखल केला.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासपा युतीचे अधिकृत उमेदवार आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार, दि. २६ मार्च २०१९ रोजी जुना मोंढा टॉवर येथुन सकाळी ११ वाजता भव्य मिरवणुक प्रारंभ होऊन गुरुद्वारा चौक - महावीर चौक - हनुमान पेठ - मुथा चौक कलामंदिर - शिवाजीनगर मार्गे मध्यवर्ती पक्ष कार्यालय गोदावरी कॉम्प्लेक्स आयटीआय येथे समारोप झाला. तसेच इंदिरा गांधी मैदान येथे सभेने सांगता झाली. नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी दाखल करताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्य सरचिटणीस आ.सुरजितसिंह ठाकूर, आ. राम पाटील रातोळीकर, डॉ.संतुकराव हंबर्डे, दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, गौतम काळे, दशरथराव लोहबंदे आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.Conclusion:
Last Updated : Mar 26, 2019, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.