ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : जपानच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यात घनवन प्रकल्प - मियावाकी पद्धत

नांदेड शहरात तहसील कार्यालय, नाना नाणी पार्क, वजिराबाद पोलीस स्टेशन अश्या ठिकाणी घनवन प्रकल्प करण्यात आला आहे. शहरात आणखी काही ठिकाणी झाडे लावली जाणार आहेत. ही सर्व झाडे लावण्यासाठी प्रशासनाला वृक्ष मित्र फाउंडेशनचे सदस्य मदत करत आहेत.

नांदेडमध्ये वृक्ष लागवड
नांदेडमध्ये वृक्ष लागवड
author img

By

Published : Aug 15, 2020, 3:21 PM IST

नांदेड - शहरातील वाढते प्रदूषण कमी व्हावे, शहरवासियांना स्वच्छ हवा मिळावी. यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने जपानच्या धर्तीवर मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करून घनवन प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शासकीय कार्यालयाच्या परिसरात जी जागा शिल्लक आहे, अशा जागी 'मियावाकी' या जपानी पद्धतीने घनवन प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात २ हजार ठिकाणी घनवन प्रकल्प राबवण्याचा संकल्प असून नांदेड शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात तब्बल ४ हजार झाडे एकाच ठिकाणी लावण्यात आली आहेत. ही झाडे शहरासाठी शुद्ध ऑक्सिजन देणारे फुफ्फुस ठरणार आहेत.

जिल्ह्यातील तहसील कार्यालय, बीडीओ कार्यालय, शाळेमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह विविध शासकीय खुल्या जागेत 'ग्रीन स्पेसेस' बनविण्याचा संकल्प केला आहे. सध्या वातावरणातील बदल यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तसेच मराठवाड्यामध्ये वनक्षेत्र कमी होत आहे. ते वाढवण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे.

नांदेड शहरात तहसील कार्यालय, नाना नानी पार्क, वजिराबाद पोलीस स्टेशन अशा ठिकाणी घनवन प्रकल्प करण्यात आला आहे. शहरात आणखी काही ठिकाणी झाडे लावली जाणार आहेत. ही सर्व झाडे लावण्यासाठी प्रशासनाला वृक्ष मित्र फाउंडेशनचे सदस्य मदत करत आहेत. घनवन प्रकल्प राबवून त्याची वर्षभर काळजी वृक्षमित्र फाउंडेशनचे सदस्य घेणार आहेत. सध्या कोरोनाचे संकट असल्याने सगळ्यांना मास्क वापरावा लागत आहे. हे कोरोनाचे संकट काही दिवसाने जाईलही पण त्यानंतरही प्रदूषणामुळे मास्क लावण्याची वेळ येऊ शकते. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर प्रत्येकाने उपलब्ध होईल. त्या जागेत मियावाकी पद्धतीने घनवन प्रकल्प करणे तितकेच गरजेचे आहे.

जिल्ह्यातील कर्मचारी नागरिकांनी पुढाकार घ्यावा- डॉ.विपीन

जिल्ह्यातील नागरिकांंनी आणि कर्मचाऱ्यांनी झाडे लागवड करावी. याचे अनेक फायदे आहेत. झाडे दूर दूर लावली तर त्याला संगोपन करायला त्रास होतो. तुम्ही एकत्रित झाडे लावली तर त्याला पाणी टाकणे, खाद्य टाकणे सोपे जाते. त्यामुळे आम्ही हे 'मिशन-2000' जो आहे तो आम्ही सगळे अधिकारी यशस्वी करू आणि एका वर्षांमध्ये आपल्याला याचा रिझल्ट दिसेल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. विपीन इंटनकर यांनी दिली.

वृक्षमित्र फाउंडेशनची मदत निस्वार्थ भावाने....!

आम्ही सगळे फक्त आनंदासाठी आम्हाला कोणालाही यामध्ये काहीही दिले जात नाही. एक आनंद मिळावा, एक आनंदाच्या भावनेतून आम्ही ही वृक्ष लागवड करत आहोत. हे जे घनवन प्रकल्प होणार आहेत शहरामध्ये मोठ्या परिमाणात ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. मोठ्या प्रमाणात कार्बन शोषले जाणार आहे आणि शहरातील मध्यवर्ती भागात आम्ही याची निवड केली आहे. या घनवन प्रकल्पामुळे पक्षांना मोठा अधिवास निर्माण होणार आहे. पाण्याची पातळी वाढणार आहे. जे काही तापमान वाढत आहे. तेही कमी होण्यास मदत होणार आहे, असे वृक्षमित्र फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.