नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत कोरोनासंदर्भात काँग्रेस पक्षावर केलेले आरोप दुर्दैवी, अशोभनीय आणि निखालस खोटे आहेत. काँग्रेस पक्षामुळे कोरोना पसरला, असा आरोप केंद्र सरकार करत असेल तर मग ही जागतिक महामारी भारतात आलीच कशी? त्यासाठी जबाबदार कोण? याचीही उत्तरे त्यांनी दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan reaction on PM speech ) म्हणाले, की कोरोना व्यवस्थापनातील आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार काँग्रेसवर चुकीचे आरोप करत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारने अकस्मात टाळेबंदी जाहीर केल्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे ( MH gov help labors in pandemic ) तर देशभरात ठिकठिकाणी असलेले परप्रांतीय मजूर आपआपल्या घराकडे परत जाऊ इच्छित होते. वाहनाची सोय नसल्याने हजारो लोकांनी मुलाबाळांसह पायीच प्रवास सुरू केला होता. ही असुविधा टाळण्यासाठी मजुरांना आपआपल्या राज्यात सुखरुप परत जाता यावे, यासाठी काँग्रेस व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने वाहनांची सुविधा उपलब्ध ( Mahavikas Aghadi work in pandemic ) करून दिली. जे मजूर महाराष्ट्रातच थांबले होते, त्यांच्यासाठी भोजन व अन्नधान्याची व्यवस्था केली.
हेही वाचा-PM Modi Criticizes Cong : पंतप्रधानांची कॉंग्रेसवर टीका, म्हणाले- मुंबईतील कोरोना बिहार-उत्तर प्रदेशात पसरवला
पंतप्रधानांकडून अशा पद्धतीचे विधान अपेक्षित नाही
ही वस्तुस्थिती असताना पंतप्रधानांनी काही राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे विधान केले असण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचे पद हे संवैधानिक आणि प्रतिष्ठेचे पद आहे. त्यामुळे पंतप्रधानांकडून अशा पद्धतीचे विधान ( Ashok Chavan slammed PM Modi ) अपेक्षित नाही. कोरोनासारख्या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे, असेही मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
पंतप्रधानांनी काय केले वक्तव्य?
पंतप्रधान संसदेत बोलताना म्हणाले, की कोरोना वैश्विक महामारी आहे, आज भारत सुमारे 100 टक्के नागरिकांना पहिला डोस तर 80 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्याचे काम पुर्ण करत आहोत पण त्यातही राजकारण केले गेले. कोरोना काळात काॅंगेसने तर हद्द केली, मुंबईतील गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांना आपआपल्या राज्यात पाठवले आणि बिहार-उत्तर प्रदेशसह देशभरात कोरोना पसरवला. सगळीकडे आफरातफरी पसरवली. दिल्ली सरकारने तर गल्ली बोळात भोंगे फिरवुन लोकांना वापस पाठवले आणि कोरोना पसरवला. कोरोना मोदीच्या प्रतिमेला धक्का बसवेल यासाठी वाट पाहत होते, अशी टीका पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
हेही वाचा-Mumbai Oxygen Demand : मुंबईत पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या मागणीत घट