ETV Bharat / state

भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरले नांदेड - नांदेडमध्ये भूकंप

नांदेड शहराला भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. हे धक्के अति सौम्य स्वरूपाचे असल्याने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन भूगर्भ अभ्यासकांनी केले आहे.

भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरले नांदेड

author img

By

Published : Oct 26, 2020, 9:08 AM IST

Updated : Oct 26, 2020, 9:14 AM IST

नांदेड- दसऱ्याच्या दिवशीच नांदेड शहर भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. शहरातील श्रीनगर, जंगमवाडी परिसरात सौम्य धक्के जाणवले. स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातील भुकंप मापक (सिसमोग्राफ) यंत्रात सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी 0.6 आणि 11 वाजून 32 मिनिटांनी 0.8 रिश्टरस्केल इतकी नोंद झाली.याबाबत भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख प्रदिप वेसनकर यांनी या भूंकपाच्या सौम्य धक्क्याबाबत माहिती दिली.

भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरले नांदेड

नांदेडसाठी भूकंपाचे धक्के नवीन नाहीत 2005, 2006, 2007 हे तीन वर्ष वारंवार तर 2011 मध्ये याच भागात धक्के जाणवले होते. 2011 मध्ये 3.5 रिश्टर स्केल हा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर आता पुन्हा धक्के जाणवायला सुरुवात झाली आहे. ज्या वर्षी पाऊस जास्त झाला आहे. त्या-त्या वर्षी हे धक्के जाणवत असल्याची माहिती वेसनकर यांनी दिली. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे वेसणकर यांनी सांगितले. तसेच ज्यांची घरे कच्ची आहेत त्यांनी मात्र सतर्क राहण्याचे आवाहनही वेसणकर यांनी यावेळी केले आहे.

Last Updated : Oct 26, 2020, 9:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.