नांदेड - मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात होणार असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. नांदेड जिल्ह्यात 123 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यापैकी चार मतदान केंद्रांमध्ये बदत करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या चार मतदान केंद्रात बदल
केंद्र क्र. 358 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथील केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालय रुम नंबर 1 नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
केंद्र क्र. 358 अ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथील केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालय रुम नंबर 2 नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
केंद्र क्र. 362 नरसिंह विद्यामंदिर जयभिमनगर नांदेड येथील मतदान केंद्र शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था रूम नं. 1 नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
केंद्र क्र. 365 जिल्हा परिषद शाळा चौफाळा येथील मतदान केंद्र मदीना उल तलुम उच्च माध्यमिक शाळा रूम नं. 1 देगलुर नाका नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
या मतदान केंद्र बदलाची नोंद सर्व मतदारांनी घ्यावी असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.