ETV Bharat / state

कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी मराठवाड्यात कमी, अधिकाऱ्यांचा हलगर्जी केल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप - कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. मराठा समाजाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल, असं सूचक विधान जरांगे पाटील यांनी केलं आहे. कुणबी प्रमाणपत्राबाबत अधिकारी हलगर्जी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 9:50 PM IST

प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील

नांदेड Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्रासाठी नोंदी मराठवाड्यात कमी आहेत. काही अधिकारी हे जाणून बुजून तपास करीत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. नांदेड, संभाजीनगर, लातूर इथल्या नोंदी सुद्धा कमी आहेत. तेथील अधिकारी मुद्दाम असणाऱ्या नोंदी हे बघत नाहीत किंवा त्यांना मनुष्यबळही देत नाहीत, त्यांच्याबाबत सरकार निर्णय घेईल. सरकारने जर निर्णय घेतला नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : नोंदी सापडण्यासाठी अभ्यासकांची आवश्यकता आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीबरोबर बोललो असल्याचंही जरांगे म्हणाले. कंधार तालुक्यातील काही अधिकारी मराठा समाजाचा द्वेष करतात अशी बाब समजल्याची प्रतिक्रिया, जरांगे पाटील यांनी दिलीय. याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती, त्यांनी प्रसार माध्यमांना दिलीय.

24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार : मराठा समाज पाहतोय सरकार किती गांभीर्याने आरक्षणाचा प्रश्न सोडवतंय. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तर मराठा समाज राजकारण्यांना दारात उभे राहू देणार नाही. नेत्यांना समाजाने मोठं केलं तेच जर आरक्षणाचा प्रश्न गांभिर्यानं घेत नसतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. मराठा समाजाची लेकरं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजे. 24 डिसेंबरपर्यंत आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत. त्यानंतर मराठा समाज काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिलीय.

नाव न घेता पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर आरोप : महाराष्ट्रातील तथा अंतरवाली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) लेखी स्वरूपात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नसल्याचं अधिवेशनात सांगितलं. यावरून जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर प्रहार केला. एकाच्या दबावाखाली येऊन जर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत नसतील तर मराठा समाज 24 तारखेनंतर काय आहे हे आम्ही दाखवून देऊ. इंदापूर येथे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. या सभेच्या स्थळी भावी मुख्यमंत्री असे बॅनर छगन भुजबळ यांचे लागलेत, यावरून जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.

छगन भुजबळ यांना दिला सल्ला : सभा कोणीही घेऊ शकतं, लोकशाहीमध्ये जातीय तेढ निर्माण करू नये, वयाचाही विचार करून शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. 35 ते 40 वर्षाचा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीने जातीय तेढ निर्माण आणि दंगलीच्या गोष्टी करायच्या कोरड्या गोष्टी करू नये. आरक्षणाच्या विरोधात बोलू नये असा सल्ला मंत्री भुजबळ यांना जरांगे पाटील यांनी दिलाय.

हेही वाचा -

  1. जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, ही लढाई जातीसाठी, एकजूट तुटू देऊ नका, समाज बांधवांना आवाहन
  2. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची सरकारला सद्बुद्धी दे; मनोज जरांगे पाटील यांनी घातलं रेणुका मातेला साकडं
  3. मनोज जरांगे पाटलांना जोरदार धक्का, आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यास गृहमंत्री फडणवीसांचा नकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.