ETV Bharat / state

70 वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष; महालिंगी ग्रामस्थांचे ओढ्यात उपोषण - महालिंगी

कुरुळापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर 1 हजार 800 लोकसंख्येचे महालिंगी गाव कंधार तालुक्याच्या शेवटच्या टोकावर अहमदपूर, जळकोटच्या सीमेवर आहे.

महालिंगी ग्रामस्थांचे ओढ्यात उपोषण
author img

By

Published : Aug 18, 2019, 12:34 PM IST

नांदेड - कंधार तालुक्यातील कुरळा ते महालिंगी हा अवघ्या 13 किलोमीटरचा पक्का रस्ता तयार करून देण्याच्या मागणीसाठी महालिंगी ग्रामस्थांनी शिवारातील भर रस्त्यावरील खचलेल्या ओढ्यात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर आमदार तुषार राठोड यांनी रस्ता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. मात्र, आमदार खरोखरच रस्ता करून देतील का? याबाबत साशंकता असल्याने ग्रामस्थांचे केविलवाणे चेहरे केले होते.

महालिंगी ग्रामस्थांचे ओढ्यात उपोषण

कुरुळापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर 1 हजार 800 लोकसंख्येचे महालिंगी गाव कंधार तालुक्याच्या शेवटच्या टोकावर अहमदपूर, जळकोटच्या सीमेवर आहे. गावात प्राथमिक शिक्षण उपलब्ध असले तरी माध्यमिक शिक्षणासाठी याच रस्त्याने पायपीट करत शेलदरामार्गे हडोळतीकडे जावे लागते. येथे 15 वर्षांपासून बस बंद आहे. पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यास घरीच शाळा भरते. या ठिकाणी 25 वर्षांपूर्वी आईच्या हातून निसटून मुलगा वाहून गेला होता. त्यानंतर अनेक जनावरेही या रस्त्यावरून वाहून गेली आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी निवडणूक आली की बगळ्यासारखे गावात उतरतात. विकासाची स्वप्ने दाखवतात, लोकही त्याला भूलतात, मतदान करतात. निवडणुकीनंतर पुन्हा सुरू होतो जीवनाचा संघर्ष.

त्यामुळे 70 वर्षात एकाही लोकप्रतिनिधीने आमच्या समस्या, प्रश्न समजून न घेतल्याने महालिंगीचे ग्रामस्थ आजही मरणयातना भोगत आहेत, असे बेमुदत उपोषणाला बसलेले 85 वर्षीय संग्राम गुट्टे यांनी सांगितले. दाद मागावी तर कोणाकडे हेच कळत नसल्याने ग्रामस्थांनी ओढ्यावरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

निवडणूक आचारसंहिता लागण्याआधीच वर्क ऑर्डर निघेल. ओढ्याच्या दोन्ही बाजुने पुलाचे तात्पुरते काम करून देतो, असे आश्वासन तुषार राठोड यांनी दिले. त्यानंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतले.

Intro:नांदेड - रस्त्यासाठी ओढ्यात उपोषण.
- ७० वर्षांपासून महालिंगीतील ग्रामस्थांचा संघर्ष.

नांदेड : कंधार तालुक्यातील कुरळा ते महालिंगी हा अवघ्या १३ किलोमीटरचा पक्का रस्ता तयार करून देण्याच्या मागणीसाठी महालिंगी येथील ग्रामस्थांनी
शिवारातील भररस्त्यावरील खचलेल्या ओढ्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
आ. तुषार राठोड यांनी आश्वासन देताच ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले खरे, पण आमदार खरोखरच
रस्ता करून देतील का? याबाबत मात्र ग्रामस्थांचे केविलवाणे चेहरे पाहायला मिळाले.Body:
कुरुळापासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर १८००
लोकसंख्येचे महालिंगी गाव कंधार तालुक्याच्या शेवटच्या टोकावर अहमदपूर, जळकोटच्या सीमेवर
आहे. गावात प्राथमिक शिक्षण उपलब्ध असले तरी माध्यमिक शिक्षणासाठी याच रस्त्याने पायपीट करत शेलदरामार्गे हडोळतीकडे जावे लागते.१५ वर्षांपासून बस बंद आहे.पावसाळ्यात ओढयाला पाणी आल्यास घरीच शाळा भरते.२५ वर्षांपूर्वी आईच्या हातून निसटून मुलगा वाहून गेला होता.त्यानंतर अनेक गुरेढोरे वाहून गेली.निवडणूक आली,की बगळ्यासारखे पुढारी उतरतात. विकासाची स्वप्ने
दाखवतात. लोकही त्याला भूलतात.मतदान करतात. निवडणुकीनंतर पुन्हा जीवनाचा संघर्ष सुरू असतो. सत्तर वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आमच्या समस्या,
प्रश्न समजून न घेतल्याने महालिंगीचे ग्रामस्थ आजही मरणयातना भोगत आहेत,असे बेमुदत उपोषणाला
बसलेले ८५ वर्षीय संग्राम गुट्टे यांनी सांगितले. दाद मागावी तर कोणाकडे हेच कळत नसल्याने ग्रामस्थांनी ओढ्यावरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पक्का
रस्ता आणि उभारण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्याआधीच वर्क ऑर्डर निघेल.Conclusion:
ओढ्याच्या दोन्ही बाजुने पुलाचे तात्पुरते काम करून देतो,असे आश्वासन आ. तुषार राठोड यांनी दिले. तर शेताला जात असताना ओढयात मी मरता मरता वाचले, असे उपोषण कर्त्यां गोदाबाई गुट्टे यांनी सांगितले. तसेच आम्हाला बस नाही, दररोज पाच सहा किलोमीटर पायी चालावे लागते,पाऊस आल्यास तर शाळा बंद करावी लागते,असे प्रतीक्षा केंद्रे या विद्यार्थीनीने सांगितले. मारोती गुट्टे यांनी सांगितले, की आमदार साहेबांनी शब्द दिल्याने उपोषण तर सोडले.
_____________________________________
FTP feed over
Ned uposhan 01
Ned uposhan 02
Ned uposhan 03
Ned uposhan 04
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.