नांदेड - मुलांना भेटण्यासाठी येत नसल्याच्या कारणावरून विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीचा दगडाने ठेचून जंगलात खून केल्याची घटना किनवट तालुक्यातील वडोली येथे घडली. या प्रकरणी किनवट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.
लग्न असूनही दोघांचे जुळले होते प्रेम
३२ वर्षीय विवाहिता माहूर तालुक्यातील लसनवाडी येथील असून तिने पतीला सोडून दिलेले आहे. त्यानंतर तिचे आरोपी पंकज जाधव (रा. पलाईगुडा) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. विशेष म्हणजे पंकजनेही त्याच्या पत्नीला सोडून दिल्याची माहिती स. पो. नि. राहुलकुमार भोळ यांनी दिली.
पतीविरुद्ध गुन्हा खूनाचा गुन्हा दाखल
आरोपी पंकज याने प्रेयसीसोबत वाद घालुन तिला वडोली येथील दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील जंगलात घेऊन गेला. यावेळी त्याने प्रेयसीसोबत वाद घालुन त्याच्या गावी असलेल्या मुलांना भेटण्यासाठी का येत नाही, या कारणावरून पंकज जाधव याने सुमारास प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी स. पो. नि. राहूल कुमार भोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक थोरात हे करीत आहेत.
प्रियकराकडून प्रेयसीचा दगडाने ठेचून खून - किनवट मर्डर न्यूज
मुलांना भेटण्यासाठी येत नसल्याच्या कारणावरून विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीचा दगडाने ठेचून जंगलात खून केल्याची घटना किनवट तालुक्यातील वडोली येथे घडली.
![प्रियकराकडून प्रेयसीचा दगडाने ठेचून खून प्रियकराकडून प्रेयसीचा दगडाने ठेचून खून](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11992087-thumbnail-3x2-ned.jpg?imwidth=3840)