ETV Bharat / state

नांदेड, हिंगोली, लातूर लोकसभेसाठी १८ एप्रिलला मतदान, २५ लाख मतदार बजावणार हक्क

या तीनही मतदारसंघातील २५ लाख २ हजार २४४ मतदार आणि त्यांच्यासाठी २९५५ मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
author img

By

Published : Mar 11, 2019, 2:43 AM IST

नांदेड - लोकसभा निवडणुकांचे बिगुल रविवारी वाजले. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आचारसंहितादेखील लागू झाली आहे. नांदेड, लातूर आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांसाठी १८ एप्रीलला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या तीनही जिल्ह्यात एकूण २५ लाख मतदार या वेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ, हिंगोली लोकसभा मतदारसंघात २ विधानसभा मतदार संघ तर लातूर लोकसभा मतदारसंघात एक विधानसभा मतदारसंघ येतो. या तीनही मतदारसंघातील २५ लाख २ हजार २४४ मतदार आणि त्यांच्यासाठी २९५५ मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या तिनही ठिकाणी १८ एप्रिलला मतदान होणार आहे. रविवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी गेल्या महिनाभरापासून सर्व तयारी सुरु करण्यात आली असून, वेगवेगळ्या मतदान केंद्रासंदर्भात व एकूण मतदार संख्येसंदर्भात पडताळणी पुर्ण करण्यात आली आहे.

आजमितीला नांदेड जिल्ह्यात नांदेड, हिंगोली आणि लातूर या ३ लोकसभा मतदारसंघांसाठी २ लाख ५० हजार २४४ मतदार नोंदविण्यात आले आहेत. नव्याने आलेली नोंदणी आणि वगळणी हा आकडा साधारण ५ हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता असून, अंतिम आकडेवारी येत्या २ ते ३ दिवसात पूर्णपणे जाहीर करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यात भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, देगलूर, मुखेड या ६ विधानसभा मतदारसंघांचा लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघात किनवट आणि हदगाव हे २ विधानसभा मतदारसंघ येतात तर, नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. नांदेड लोकसभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघांसाठी नांदेड जिल्ह्यातूनच प्रशासकीय यंत्रणा राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली आहे.

Intro:नांदेड लोकसभा मतदार संघात १८ एप्रिलला मतदान...;जिल्ह्यात २५ लाख मतदार बजावणार हक्क...!

नांदेड: जिल्ह्यात नांदेड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ, हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदार संघ आणि लातूर लोकसभा मतदारसंघात एक विधानसभा मतदारसंघ येतो. या सर्व मतदारसंघातील २५ लक्ष २ हजार २४४ मतदार आणि त्यांच्यासाठी २९५५ मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या तिन्ही ठिकाणी 18 एप्रिल ला मतदान होणार आहे.
आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सर्व तयारी सुरु करण्यात आली असून, वेगवेगळ्या मतदान केंद्रासंदर्भात व एकूण मतदार संख्येसंदर्भात पडताळणी करण्यात आली आहे. मतदारांची नावे वगळणी व या महिन्यात झालेल्या नविन मतदारांची आकडेवारी येत्या दोन दिवसात उपलब्ध होईल. आजमितीला नांदेड जिल्ह्यात नांदेड, हिंगोली आणि लातूर या तीन लोकसभा मतदारसंघासाठी २ लाख ५० हजार २४४ मतदार नोंदविण्यात आले आहेत. नव्याने आलेली नोंदणी आणि वगळणी हा आकडा साधारणतः पाच हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता असून, अंतिम आकडेवारी येत्या दोन ते तीन दिवसात पूर्णपणे जाहीर करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, देगलूर, मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाचा नांदेड लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी याठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघाची मिळून १७ लाख ९९१ मतदार हे नोंदविल्या गेले आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात किनवट आणि हदगाव ही दोन मतदारसंघ येतात. तेथे ५ लक्ष ३१ हजार ११६ मतदार आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो. तेथे २ लाख ७० हजार १३७ मतदार आहेत. नांदेड लोकसभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यातूनच प्रशासकीय यंत्रणा राबविण्यात येणार असली तरी मतपत्रिका या तेथील मतदारसंघानुसार मतदान यंत्रावर येणार आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १९९६ मतदान केंद्रे तर हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी ६४७ तर लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ३१२ मतदान केंद्रे असणार आहेत. तृतीयपंथीय मतदारांची संख्या ही नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ५८, हिंगोलीसाठी ९ आणि लातूरसाठी ३ मतदार आहेत. मतदान यंत्रावर नन ऑफ द अबोह अर्थात यापैकी कोणी नाही यासाठीही मतदानाचा पर्याय ठेवण्यात आला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी गेल्या तीन महिन्यात जनजागृती अभियान राबविण्यात आल्याचीही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. यामुळे मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेची आचारसंहिता रविवारपासून लागू होणार असल्याने या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी, जि.प.पदाधिकारी, महापालिका यांच्याकडे असलेली वाहने जमा करण्याचे काम आज रात्रीपासूनच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत महत्वाची असून, त्यांना याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या तहसील कार्यालयावर व त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत यासाठी वेगवेगळी पथके निर्माण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.Body:नांदेड लोकसभा मतदार संघात १८ एप्रिलला मतदान...;जिल्ह्यात २५ लाख मतदार बजावणार हक्क...!

नांदेड: जिल्ह्यात नांदेड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ, हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदार संघ आणि लातूर लोकसभा मतदारसंघात एक विधानसभा मतदारसंघ येतो. या सर्व मतदारसंघातील २५ लक्ष २ हजार २४४ मतदार आणि त्यांच्यासाठी २९५५ मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या तिन्ही ठिकाणी 18 एप्रिल ला मतदान होणार आहे.
आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सर्व तयारी सुरु करण्यात आली असून, वेगवेगळ्या मतदान केंद्रासंदर्भात व एकूण मतदार संख्येसंदर्भात पडताळणी करण्यात आली आहे. मतदारांची नावे वगळणी व या महिन्यात झालेल्या नविन मतदारांची आकडेवारी येत्या दोन दिवसात उपलब्ध होईल. आजमितीला नांदेड जिल्ह्यात नांदेड, हिंगोली आणि लातूर या तीन लोकसभा मतदारसंघासाठी २ लाख ५० हजार २४४ मतदार नोंदविण्यात आले आहेत. नव्याने आलेली नोंदणी आणि वगळणी हा आकडा साधारणतः पाच हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता असून, अंतिम आकडेवारी येत्या दोन ते तीन दिवसात पूर्णपणे जाहीर करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, देगलूर, मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाचा नांदेड लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी याठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघाची मिळून १७ लाख ९९१ मतदार हे नोंदविल्या गेले आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात किनवट आणि हदगाव ही दोन मतदारसंघ येतात. तेथे ५ लक्ष ३१ हजार ११६ मतदार आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो. तेथे २ लाख ७० हजार १३७ मतदार आहेत. नांदेड लोकसभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यातूनच प्रशासकीय यंत्रणा राबविण्यात येणार असली तरी मतपत्रिका या तेथील मतदारसंघानुसार मतदान यंत्रावर येणार आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १९९६ मतदान केंद्रे तर हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी ६४७ तर लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ३१२ मतदान केंद्रे असणार आहेत. तृतीयपंथीय मतदारांची संख्या ही नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ५८, हिंगोलीसाठी ९ आणि लातूरसाठी ३ मतदार आहेत. मतदान यंत्रावर नन ऑफ द अबोह अर्थात यापैकी कोणी नाही यासाठीही मतदानाचा पर्याय ठेवण्यात आला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी गेल्या तीन महिन्यात जनजागृती अभियान राबविण्यात आल्याचीही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. यामुळे मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेची आचारसंहिता रविवारपासून लागू होणार असल्याने या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी, जि.प.पदाधिकारी, महापालिका यांच्याकडे असलेली वाहने जमा करण्याचे काम आज रात्रीपासूनच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत महत्वाची असून, त्यांना याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या तहसील कार्यालयावर व त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत यासाठी वेगवेगळी पथके निर्माण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.