ETV Bharat / state

डोंगरगाव शिवारात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

मुदखेड तालुक्यातील मोजी डोंगरगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी केशवराव किसनराव पाटील व्यवहारे यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्या असल्याची माहिती आहे.

बिबट्या
बिबट्या
author img

By

Published : Jun 3, 2021, 5:11 PM IST

Updated : Jun 3, 2021, 10:30 PM IST

नांदेड- मुदखेड तालुक्यातील मोजी डोंगरगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी केशवराव किसनराव पाटील व्यवहारे यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्या असल्याची माहिती आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उसाच्या शेतात हा बिबट्या असल्याचा व्हिडिओ व्हारल झाला आहे. बिबट्याला पकडून जंगलात सोडण्याची मागणी गावकाऱ्यांकडून केली जात आहे.

डोंगरगाव शिवारात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शेतीकाम करताना रात्री आढळला बिबट्या

रात्रीच्या वेळी शेतातील नांगरणी काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येत असताना ट्रॅक्टर चालक प्रेम केदारे यांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या हेडलाईटसमोर उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर येताना दिसला.

बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. या परिसरात जनावराच्या शिकारी केलेल्या घटना घडल्या आहेत. तर आठ दिवसांपासून हा बिबट्या परिसरातील शेतकऱ्यांना दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतावर कामासाठी जाणाऱ्यांना भीती वाटत असल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. तर शेतकऱ्यांच्या शेतातील जनावरांवर बिबट्या हल्ला करेल, अशी भिती सतावत आहे.

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

मागील अनेक दिवसांपासून मुदखेड तालुका परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. वनविभागाने याकडे गांभीर्य घ्यावे आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

Last Updated : Jun 3, 2021, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.