ETV Bharat / state

नांदेडमध्ये श्रावणाच्या सरीने खरिपाची पिके बहरली, पाणीसाठ्यात वाढ नाही - नांदेड पाऊस

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ४६९ मिलिमीटरनुसार ५०.५२ टक्के पाऊस झाला आहे.

खरिपाची पिके
author img

By

Published : Aug 9, 2019, 12:50 PM IST

नांदेड - जिल्ह्यात २ दिवसांपासून होणाऱ्या भीज पावसामुळे खरिपातील पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २९.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या भीज पावसाने खरिपाची पिके बहरली मात्र, पाणीसाठ्यात अद्यापही अपेक्षित वाढ नाही.

नांदेडमध्ये श्रावणाच्या सरीने खरिपाची पिके बहरली

हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४६९ मिलिमीटरनुसार ५०.५२ टक्क्यांवर पोचला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २९.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, लोहा, किनवट, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव व मुखेड तालुक्यात चांगला झाला. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ४६९ मिलिमीटरनुसार ५०.५२ टक्के पाऊस झाला. हा पाऊस पिकांना हवा तसा भीज स्वरूपात असल्यामुळे जमिनीत पाणी मुरत आहे. परिणामी जिल्ह्यातील खरीप पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. पण पाणीसाठ्यात मात्र कुठलीही वाढ नसल्याचे दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी

१) नांदेड = २०.३८
२) मुदखेड = २४.००
३) अर्धापूर = ०९.६७
४) भोकर = ०९.७५
५) उमरी = ३२.६७
६) कंधार = ६५.००
७) लोहा = ५३.००
८) किनवट = १७.००
९) माहूर = १६.५०
१०) हदगाव = ०७.४३
११) हि. नगर = ०३.६७
१२) देगलूर = ३०.५०
१३) बिलोली = ५६.८०
१४) धर्माबाद = ३०.६७
१५) नायगाव = ४४.२८
१६) मुखेड = ४८.७१
एकूण = ४६९.९५
एकूण टक्केवारी = २९.३७

विष्णुपुरी धरणात अद्यापही पाणीसाठ्यात वाढ नाही...!

नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात गुरुवारी सकाळी मृत पाणीसाठ्याच्यावर आले आहे. सध्या प्रकल्पात थोडी वाढ होत आहे. एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे महापालिकेच्यावतीने ६ दिवसांआडच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गोदावरी तसेच पूर्णा नदीच्या वरील भागात अजूनही म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे विष्णुपुरीत पाणीसाठा झाला नाही. पूर्णा नदीला थोडेफार पाणी आले असून ते अंतेश्वर बंधाऱ्यातून पुढे गोदावरीत आले आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

Intro:श्रावणाच्या सरीने खरिपाची पिके बहरली पण पाणीसाठ्यात मात्र अपेक्षित वाढ नाही...!

नांदेड : श्रावण महिना सुरू होताच जिल्ह्यात पावसाच्या लहान - मोठ्या सरी कोसळत आहेत . मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात होणाऱ्या भिज पावसामुळे खरिपातील पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. मंगळवार पासून दुपारनंतर जिल्ह्यात सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत सुरू होता . गुरुवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी २९ . ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या भीज पावसाने खरिपाची पिके बहरली मात्र पाणीसाठ्यात अद्यापही अपेक्षित वाढ नाही.Body:श्रावणाच्या सरीने खरिपाची पिके बहरली पण पाणीसाठ्यात मात्र अपेक्षित वाढ नाही...!

नांदेड : श्रावण महिना सुरू होताच जिल्ह्यात पावसाच्या लहान - मोठ्या सरी कोसळत आहेत . मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात होणाऱ्या भिज पावसामुळे खरिपातील पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. मंगळवार पासून दुपारनंतर जिल्ह्यात सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत सुरू होता . गुरुवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी २९ . ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या भीज पावसाने खरिपाची पिके बहरली मात्र पाणीसाठ्यात अद्यापही अपेक्षित वाढ नाही.
हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४६९ मिलिमीटरनुसार ५० . ५२ टक्क्यांवर पोचला आहे. गुरुवारी सकाळी आठ पर्यंत सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २९ . ६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर,
लोहा, किनवट, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव व मुखेड तालुक्यात चागंला झाला.
जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ४६९ मिलिमीटरनुसार ५० . ५२ टक्के पऊस झाला . हा पाऊस पिकांना हवा तसा भिज स्वरूपात असल्यामुळे जमिनीत पाणी मुरत आहे . परिणामी जिल्ह्यातील खरीप पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. पण पाणीसाठ्यात मात्र कुठलीही वाढ नसल्याचे दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी......

दि. 08/08/2019
_________________________
1) नांदेड = 20.38
_________________________
2) मुदखेड = 24.00
_________________________
3) अर्धापूर = 09.67
_________________________
4) भोकर = 09.75
_________________________
5) उमरी = 32.67
_________________________
6) कंधार = 65.00
_________________________
7) लोहा = 53.00
_________________________
8) किनवट = 17.00
_________________________
9) माहूर = 16.50
_________________________
10) हदगाव = 07.43
_________________________
11)हि. नगर = 03.67
_________________________
12) देगलूर = 30.50
_________________________
13) बिलोली = 56.80
_________________________
14) धर्माबाद = 30.67
_________________________
15) नायगाव = 44.28
_________________________
16) मुखेड = 48.71

एकूण = 469.95
एकूण टक्केवारी = 29.37

विष्णुपुरी धरणात अद्यापही पाणीसाठ्यात वाढ नाही...!

नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात गुरुवारी सकाळी मृत पाणीसाठ्याच्या वर आले आहे. सध्या प्रकल्पात थोडी वाढ होत आहे. एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे महापालिकेच्या वतीने सहा दिवसांआडच पाणीपुरवठा करण्यात येत आहे . गोदावरी तसेच पूर्णा नदीच्या वरील भागात अजूनही म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही . त्यामुळे विष्णुपुरीत पाणीसाठा झाला नाही . पूर्णा नदीला थोडेफार पाणी आले असून ते अंतेश्वर बंधाऱ्यातून पुढे गोदावरीत आले आहे . मात्र , त्याचे प्रमाण अत्यल्प आहे . अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.