ETV Bharat / state

पैनगंगा नदीवरील इसापूर धरण ओव्हरफ्लो; दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Isapur dam on Penganga river

पैनगंगा नदीवरील इसापूर धरण आता ओव्हरफ्लो झाले आहे. पैनगंगा नदीपात्राता पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Isapur dam
इसापूर धरण ओव्हरफ्लो
author img

By

Published : Sep 13, 2021, 7:38 PM IST

Updated : Sep 13, 2021, 10:30 PM IST

नांदेड - मराठवाड्यात जायकवाडीनंतर मोठे धरण असलेले पैनगंगा नदीवरील इसापूर धरण आता ओव्हरफ्लो झाले आहे. इसापूर धरणाचा पाणीसाठा 98. 51 टक्के इतका झाल्यामुळे 13 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता सांडवा विसर्ग 0.20 मीटरने गेट क्र. 2 व 14 या 2 गेटमधून पाणी सोडण्यात आले आहे. 38.912 क्युसेक्सने धरणातील अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

पैनगंगा नदीवरील इसापूर धरण ओव्हरफ्लो

हेही वाचा - माझ्यावरील आरोप चुकीचे, सोमैयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार - मंत्री मुश्रीफ

  • नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा -

पैनगंगा नदीपात्राता पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या अनुषंगाने हदगाव, हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आपली, आपल्या गुराढोरांची, शेतीमालाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

  • गरज पडल्यास आणखी दरवाजे उघडण्यात येतील -

मागील काही दिवसांपासून मराठवाडा व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संततधार पाऊस चालू असल्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सगळे धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यात इसापूर धरणसुद्धा 98.51 टक्के भरले आहे. धरणाच्या वरील भागातून पाण्याची आवक असल्यामुळे धरणाचे दोन दरवाजे आज वीस सेंटीमीटरने उघडले आहेत. तसेच येणाऱ्या काळामध्ये धरणामध्ये पाण्याची आवक वाढली असून, दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच आणखी काही दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती पैनगंगा प्रकल्प उपविभागीय अभियंता एच, एस, धुळगंडे यांनी दिली.

हेही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरण : आरोपीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; पीडितेच्या कुटुंबाला 20 लाखांची मदत

Last Updated : Sep 13, 2021, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.