ETV Bharat / state

नांदेडामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुर्वी तपासणीत आठ जण पॉझिटिव्ह

आज शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी कोरोनाची अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी करूनच सभागृहामध्ये प्रवेश देण्यात आला.

Zilla Parishad Nanded
जिल्हा परिषद नांदेड
author img

By

Published : Mar 5, 2021, 10:21 PM IST

नांदेड - आज शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी कोरोनाची अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी करूनच सभागृहामध्ये प्रवेश देण्यात आला. यात एका सभापतींसह एकूण ८ जण बाधीत आढळून आले आहेत. यात अधिकारी, कर्मचारी आणि तीन जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण सभेत जाताना केली अँटीजन टेस्ट-

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शासनाच्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करूनच व्हावी, यासाठी कोविड -१९ ची तपासणी करूनच सभागृहात प्रवेश दिला गेला. सभा सुरू होण्यापुर्वी १३० जणांची तपासणी करण्यात आली. यात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापतींसह अधिकारी, कर्मचारी व तीन जिल्हा परिषद सदस्य, असे एकूण ८ जण पॉझिटिव्ह आठळून आले आहेत.

एकीकडे सभा तर दुसरीकडे अँटीजन टेस्ट-

अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी सुरू होती. एकीकडे सभागृहात सर्वसाधारण सभा व दुसरीकडे सभागृहाच्या गेटवर तपासणी, असे चित्र दिसून आले.

रिक्त पदे भरण्याची मागणी-

दरम्यान जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांवरील सदस्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. यावरून सदस्या शिलाताई निखाते व समाधान जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

हेही वाचा- पोलिसांना भेटायला गेले त्यानंतर परतलेचं नाहीत, मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा खूलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.