नांदेड - जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 1 हजार 476 इतके स्वॅब घेतले असून 3 लाख 28 हजार 574 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात 22 मार्च 2020 पासून आजपर्यंत (17 एप्रिल) 65 हजार 150 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 50 हजार 80 रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून 1 हजार 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात विविध कोविड सेंटरमध्ये 13 हजार 607 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.86 टक्के इतके आहे.
शुक्रवारचे कोरोना रुग्ण -
शुक्रवारी 4 हजार 676 अहवालापैकी 1 हजार 351 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 613 तर अँटिजेन तपासणीद्वारे 738 अहवाल बाधित आढळले. जिल्ह्यात सध्या 226 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 14 ते 16 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज 1 हजार 234 कोरोना रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.86 टक्के आहे.
उपलब्ध खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 12 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
* एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 1 हजार 476
* एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 28 हजार 574
* एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 65 हजार 150
* एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 50 हजार 80
* एकूण मृत्यू संख्या-1 हजार 202
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.86 टक्के
* आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 4
* आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 37
* आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 387
* रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 13 हजार 607
* आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 226