ETV Bharat / state

Nanded Crime News : बायकोला धारदार शस्त्राने भोसकल्यानंतर नवऱ्याने विष घेऊन आत्महत्या - nanded suicide case

बायकोला धारदार शस्त्राने भोसकल्यानंतर नवऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेडच्या सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. माहूर तालुक्यातील कासारपेठ गावातील ही दुर्दैवी घटना आहे. ( Husband Suicide After hitting Wife in Nanded )

nanded suicide case
नांदेड विष घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Jun 4, 2022, 1:40 PM IST

Updated : Jun 4, 2022, 5:27 PM IST

नांदेड - बायकोला धारदार शस्त्राने भोसकल्यानंतर नवऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेडच्या सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. माहूर तालुक्यातील कासारपेठ गावातील ही दुर्दैवी घटना आहे. ( Husband Suicide After hitting Wife in Nanded )

पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु - मयत विजय जाधव याचा पत्नी निशासोबत शेत शिवारात काम करताना किरकोळ वाद झाला. या वादातून विजयने धारदार शस्त्राने पत्नीला भोसकले, यावेळी जवळच्या शेतकऱ्यांनी धाव घेत जखमी निशाला रुग्णालयात हलवले. त्या नंतर पत्नी मयत झाल्याची अफवा ऐकून विजयने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, जखमी असलेल्या निशावर यवतमाळमध्ये उपचार सुरू आहेत.

मानसिक तणावातून पतीने केली आत्महत्या - विषारी औषध घेत आत्महत्या करण्याआधी पत्नीला भोसकल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील कासारपेठ येते घडली. पती पत्नीमध्ये वाद झाला आणि वाद टोकाला गेला त्यात पतीने मानसिक ताणवातून पतीने आत्महत्या केली. या दाम्पत्याला एकूण ३ मूल असून या मुलांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डोक्यावरचे छत्र हरपले असून आता त्यांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

शेतात काम करताना झाला होता वाद - कासारपेठ येते विजय जाधव (३३) आणि पत्नी निशा (२९) हे दोघे शिवारातील शेतात काम करण्यासाठी गेले होते. सकाळी साडे आठच्या सुमारास त्याचे पत्नीसोबत भांडण झोले. याच दरम्यान शेतातील कामासाठी नेलेल्या धारदार हत्याराने त्याने पत्नीवर वार केला. ही बाब शेजारी शेतात काम करीत असलेल्या अन्य शेतकऱ्यांनी पाहिली. जखमी झालेली निशा माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या नंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयात नेले आहे.

हेही वाचा - बहिण बुडत असल्याचे पाहुन तिनेही मारली गोदावरीत उडी... अन् दोघीही बुडाल्या; बीडमधील घटना

हेही वाचा - नांदेड-हैदराबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ४ ठार

Last Updated : Jun 4, 2022, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.