ETV Bharat / state

कुऱ्हाडीचे वार करून दारुड्या नवऱ्याने केला पत्नीचा खून - कुऱ्हाडीच्या घावाने दारुड्या नवऱ्याने केला पत्नीचा खून

नांदेड - तिरकसवाडी येथे दारुड्या नवऱ्याने झोपेत असलेल्या पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हा खून केला आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावर बारड पोलिसांनी भेट दिली असून, पोलीस गुन्हेगाराच्या शोधात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे यांनी दिली आहे.

पोलीस ठाणे बारड, ता मुदखेड. जि. नांदेड
पोलीस ठाणे बारड, ता मुदखेड. जि. नांदेड
author img

By

Published : Aug 10, 2021, 10:37 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील तिरकसवाडी (ता. मुदखेड) येथे दारुड्या नवऱ्याने झोपेत असलेल्या पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हा खून केला आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावर बारड पोलिसांनी भेट दिली असून, पोलीस गुन्हेगाराच्या शोधात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे यांनी दिली आहे.

दारूच्या नशेत केले कुऱ्हाडीने घाव

जिल्ह्यातील तिरकसवाडी (ता.मुदखेड) येथील रहीवासी ज्ञानेश्वर मारोती शिंदे यांनी (सोमवार, दि. ९) रात्री झोपेत असलेल्या पत्नी ताई शिंदे (वय-२९ वर्षे) व्यवसाय मजुरी यांचा दारुच्या नशेत कुऱ्हाडीचे डोक्यात, हातावर घाव घालून खून केला. या घटनेनंतर स्थानिकांनी ताईबाई शिंदे यांना उपचारासाठी बारड रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

पत्नीच चालवायची घर

ताईबाई शिंदे या घरगुती कामावरून सतत भांडण व त्रास देत असे. ज्ञानेश्वर हा एक महीन्यापासून आळंदी येथे कामाला गेला होता. दोन दिवसापूर्वी तो गावात आला असल्याचे, समजले. ज्ञानेश्वर आणि त्यांची पत्नी ताई शिंदे यांच्यात नवरा दारुडा असल्याने नेहमी होत होते. दारुड्या फिरस्ती नवरामुळे घरातील जबाबदारी ही मयत पत्नी ताई शिंदे यांच्यावरच होती. मजुरी व घरची शेती करत ती मुलगा अनिकेत वय १५ वर्षे मुलगी आचल वय १३ वर्षे यांचा सांभाळ करत शिक्षण देत संसाराचा गाडा चालवत असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मयताचा भाऊ फिर्यादी सोनाजी अर्जुन ढगे (वय-२७) रा. आडगाव जि. हिंगोली) यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर मारोती शिंदे रा. तिरकसवाडी याच्यावर खुनाचा बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत ताई शिंदेचा पती ज्ञानेश्वर अद्याप फरार आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी वैद्यकीय प्रयोग शाळा पथक, व शान पथकास तपासासाठी पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुगावे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.