ETV Bharat / state

वृद्ध महिलेचा गळा दाबून दमदाटी करत मोलकरणीने पळवले दागिने - नांदेड चोरी बातमी

देगलूर शहरातील शिवबानगर भागात डॉ. विनायक मुंडे यांचा दवाखाना व निवासस्थान आहे. सकाळी डॉ. मुंडे व त्यांच्या पत्नी डॉ. मुक्ता मुंडे दोघे दवाखान्यात गेले होते. दरम्यान, विनायक यांच्या वृद्ध आईला गळा दाबून दमदाटी करत मोलकरणीने त्यांचे दागिने पळवले.

jewelry stolen-in-naded
jewelry stolen-in-naded
author img

By

Published : Jan 7, 2020, 1:29 PM IST

नांदेड- येथील देगलूर शिवबानगर भागातील डॉ. विनायक मुंडे यांच्या घरी राहणाऱ्या मोलकरणीने त्यांच्या आईचा गळा दाबून दमदाटी करत सोन्याची लूट केली आहे. यात साडेसहा तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

हेही वाचा- 'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!

देगलूर शहरातील शिवबानगर भागात डॉ. विनायक मुंडे यांचा दवाखाना व निवासस्थान आहे. सकाळी डॉ. मुंडे व त्यांच्या पत्नी डॉ. मुक्ता मुंडे दोघे शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात गेले होते. याच संधीचा फायदा घेत मोलकरीण शेख रिहाना ऊर्फ शीतल सतीश इंगळे हिने डॉ. मुंडे यांच्या आईला (ठकूबाई मुंडे) तुम्हाला आंघोळ घालते म्हणून स्नानगृहात नेले. तिने त्यांचा गळा दाबून दमदाटी करत गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठण, अडीच तोळयाचे लॉकेट, गळ्यातील सात ग्रॅमच्या मण्यासह एकूण साडेसहा तोळ्याचे दागिने पळवले. याची किंमत १ लाख ३५ हजार रुपये आहे.

या मोलकरणीला पाच दिवसांपूर्वीच मुंडे यांनी कामावर ठेवले होते. (तिचे नाव रिहाना शेख असून तिने लग्नानंतर शीतल सतीश इंगळे असा नावात बदल केला होता.) दरम्यान, चोरी करण्यापूर्वी तिचा नवरा तेथून गेला होता. तिची रहाण्याची व्यवस्था मुंडे यांनी त्यांच्या घरी केली होती. डॉ. विनायक मुंडे यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगम परगेवार हे करीत आहेत. आरोपी महिलेच्या अटकेसाठी देगलूर पोलिसांची एक पथक हैदराबाद येथे रवाना झाले आहे.

Intro:नांदेड : वृद्ध महिलेचा गळा दाबून मोलकरणीने दागिने पळविले.

नांदेड : देगलूर येथील शिवबानगर भागातील डॉ.विनायक मुंडे यांच्या घरी राहणाऱ्या मोलकरणीने त्यांच्या आईचा गळा दाबून गळ्यातील गंठण, लॉकेट व सात ग्रॅम सोन्याचे मणी असे साडे सहा तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ च्या सुमारास घडली.Body:देगलूर शहरातील शिवबानगर भागात डॉ. विनायक मुंडे यांचा दवाखाना व निवासस्थान आहे.सकाळी डॉ. विनायक मुंडे व त्यांच्या पत्नी डॉ. मुक्ता मुंडे हे दोघे
शस्त्रक्रियेसाठी खाली दवाखान्यात गेले होते. याच संधीचा फायदा घेत घरातील मोलकरणीन शेख रिहाना ऊर्फ शीतल सतीश इंगळे हिने डॉक्टरच्या आईस ठकूबाई मुंडे यांना तुम्हाला आंघोळ घालते म्हणून स्नानगृहात नेले. स्नानगृहात जाताच तिने त्यांचा गळा दाबून गळ्यातील साडेतीन तोळयाचे गंठण, अडीच तोळयाचे लॉकेट, गळयातील सात
ग्रॅमच्या मण्यासह एकूण साडे सहा तोळ्याचे दागिने पळविले. ज्याची किंमत १ लाख ३५ हजार रुपये
होती.Conclusion:
ही मोलकरीण पाच दिवसांपूर्वी पासून कामाला होती.चोरी करण्यापूर्वी मोलकरणीचा नवरा तेथून गेला होता. या मोलकरणीस व तिच्या नवऱ्याची रहाण्याची व्यवस्था डॉक्टरानी त्यांच्या घरी केली होती.दरम्यान डॉ. विनायक मुंडे यांच्या फिर्यादी वरून देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा (०४/२०२०) दाखल करण्यात
आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगम परगेवार हे करीत आहेत. आरोपी महिलेच्या अटकेसाठी देगलूर पोलिसांची एक पथक हैद्राबाद येथे रवाना झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.