ETV Bharat / state

फळविक्रेत्या महिलेचा प्रामाणिकपणा; ४८ हजार रुपये किंमतीची अंगठी केली परत

कंधार शहरातील महाराणा प्रताप चौकात ४८ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी एका फळविक्रेत्या महिलेला सापडली. त्या महिलेने ही अंगठी संबंधितांना परत करून प्रामाणिकपणा दाखवून दिला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक तालुक्यामधून होत आहे.

Honest woman return gold ring in kandhar nanded
फळ विक्रेत्या महिलेचा प्रामाणिकपणा; ४८ हजार रुपये किंमतीची अंगठी केली परत
author img

By

Published : Jun 25, 2020, 12:22 PM IST

नांदेड - कंधार शहरातील महाराणा प्रताप चौकात ४८ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी एका फळविक्रेत्या महिलेला सापडली. त्या महिलेने ही अंगठी संबंधितांना परत करून प्रामाणिकपणा दाखवून दिला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक तालुक्यामधून होत आहे.

निर्मलाबाई यांचे साड-चोळीचा जोड आहेर देऊन आभार मानताना ढवळे कुटुंबीय...

लोहा तालुक्यातील चोंडी येथील सुधाकर दवळे हे लाठी (खुर्द) येथे आपल्या मेहुण्याच्या येथे शाल अंगठीच्या आयोजित कार्यक्रमासाठी जात होते. त्यांनी महाराणा प्रताप चौक येथे एक अंगठी खरेदी केली आणि लगबगीने ते दुचाकीवरून लाठी (खुर्द) कडे निघाले. परंतु, खिशातील रुमाल काढताना महाराणा प्रताप चौकात दोन अंगठ्यांपैकी एक अंगठी पडली. तिथे काही वेळानंतर फळं विक्री करणाऱ्या निर्मलाबाई कांबळे आल्या. त्यांच्या नजरेस ती दिसली. तेव्हा त्यांनी ती अंगठी घेतली.

काही वेळाने अंगठी गहाळ झाल्याचे लक्षात येताच ढवळे यांनी शोधाशोध सुरू केली. ते महाराणा चौकात अंगठी शोधत असल्याचे निर्मलाबाई यांच्या निदर्शनात आले. तेव्हा त्यांनी अंगठी ढवळे यांचीच आहे की नाही, याची खातरजमा करून घेतली. खात्री होताच त्यांनी ती अंगठी ढवळे यांना परत केली.

अंगठी मिळताच ढवळे यांना अत्यानंद झाला आणि त्यांनी निर्मलाबाई यांना साडी-चोळीचा जोड आहेर देऊन आभार मानले. दरम्यान, निर्मलाबाई यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक तालुक्यातून होत आहे.

हेही वाचा - खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 7 जणांना अटक

हेही वाचा - हिमायतनगर तालुक्यात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, शेतकरी समाधानी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.