ETV Bharat / state

निर्मल-ठाणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान... जमीन खरडली, तर पिकं पाण्याखाली - heavy rain in nanded

कालपासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच रात्री पावसाचा जोर वाढल्याने अधिकचे पाणी शेतातून वाहिले आहे. निर्मल ते ठाणे राष्ट्रीय महामार्गचे सध्या काम चालू असून या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामुळे शेतात पुराचे पाणी शिरले. यामुळे शेतातील पीक मातीसह खरडून गेले आहे.

monsoon in nanded
निर्मल-ठाणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान...जमीन खरडली, तर पिकं पाण्याखाली
author img

By

Published : Jul 17, 2020, 10:04 AM IST

नांदेड - जिल्ह्यात मुसळधार गुरुवार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच रात्री पावसाचा जोर वाढल्याने अधिकचे पाणी शेतातून वाहिले आहे. निर्मल ते ठाणे राष्ट्रीय महामार्गचे सध्या काम चालू असून या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामुळे शेतात पुराचे पाणी शिरले. यामुळे शेतातील पीक मातीसह खरडून गेले आहे.

स्थानिक ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. जिल्ह्यात नदी नाल्याकाठच्या शेत जमिनी खरडल्याचे प्रकार काही ठिकाणी घडले आहेत. काही भागात पुरामुळे नदी व नाल्याच्या कडेला असणाऱ्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

निर्मल-ठाणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान...जमीन खरडली, तर पिकं पाण्याखाली

शहरानजीक वाहणाऱ्या आसना नदीकडे जाणाऱ्या अनेक नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. निर्मल ते ठाणे 222 क्रमांकच्या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू आहे. या मार्गावरील मेंढला येथे चुकीच्या पद्धतीने रस्त्यानजीक असलेल्या नाल्याचे चुकीचे काम झाल्याने शेतातील पाण्याचा अद्याप निचरा झाला नाहीय. त्यामुळे शेतातच पाणी साचले व इतर ठिकाणी जमीन खचली. शेकडो हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. अर्धापूर आणि नांदेड या दोन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अर्धापूर तालुक्यात ८० मिलीमीटर तर नांदेड तालुक्यात ७४.६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजता घेण्यात आलेल्या नोंदीनुसार सरासरी ३८.८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

अर्धापूर तालुक्यातील दाभड महसूल मंडळात सर्वाधिक ११७ मिलीमीटर पाऊस झाला. तर त्या खालोखाल मांजरम १११, अर्धापूर ९७, तुप्पा ९०, तरोडा बुद्रुक ८३, माळेगाव ८२, नांदेड ग्रामीण ८०, वसरणी ८०, नांदेड शहर ७७, कलंबर ७४, वजीराबाद ७३, धर्माबाद ६८, विष्णुपूरी ६७, मरखेल ६२, उस्माननगर ६०, जांब ६०, नर्सी ६०, बारूळ ५९, कंधार ५८, हानेगाव ५७, माळाकोळी ५७, फुलवळ ५६, कुंटूर ५५, लोहगाव ५५, मातुळ ५३, नायगाव ५२, जाहूर ५२, लोहा ४८, सोनखेड ४८, कापसी ४८, बिलोली ४८, मुगट ४८, कुंडवाडी ४७, लिंबगाव ४७, बरबडा ४०, बारड ३८, मोगाळी ३६, कुरुळा ३३, सगरोळी ३२, भोकर ३२, माहूर ३१, शेवडी ३० मिली मीटर पेक्षा अन्य महसूल मंडळातही पाऊस पडला आहे. ६० ते ५० मिलिमीटर १४ महसूल मंडळात पाऊस झाला आहे. तर ५० ते ३० मीली मीटर पावसाची १५ महसूल मंडळात नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.