नांदेड - जिल्ह्यात एक हृदयदायक घटना घडली आहे. येथील एका शेतकऱ्यांच्या मुलीची सारसकडच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळवणूक (Harassment of daughter for dowry) चालली होती. ही बाब तिने आपल्या वडिलांना सांगितली, वडिलांनी आपण मुलीच्या मागणीची पूर्तता करू शकत नाही या विचार आत्महत्या (suicide of father) केली. दरम्यान माहेरी आलेली मुलीने वडिलांनी आपल्यासाठी आत्महत्या केली हे दुःख सहन न झाल्याने वडिलांच्या शेजारीच देह (daughter also died next to father ) ठेवला.
आठ महिन्यापूर्वी झाला होता विवाह -
देगलूर तालुक्यातील सुगाव येथील शंकर भोसले यांनी माधुरी हिचा विवाह आठ महिन्यापुर्वी मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संदीप वडजेशी लावून दिला होता. संदीप पुणे येथे कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर पती संदीप आणि सासरच्या मंडळींनी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी 5 लाखाची मागणी माधुरीकडे करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागले. माधुरीने ही बाब वडील शंकर भोसले यांना सांगितली.
वडिलांच्या मृता शेजारीच मुलीने प्राण सोडले -
शंकर भोसले यांनी अगोदरच मुलीचे लग्न कर्ज काढून केले होते, ते कर्ज फिटले नाही. आता पाच लाख कुठून आणू म्हणून चिंतेत होते. काल रात्री मुलीच्या सासरकडची मागणी पूर्ण करु शकत नाही म्हणून शंकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचे दुःख माहेरी असलेल्या माधुरीला सहन झाले नाही आणि तिने वडीलांच्या मृतदेहाची शेजारीच प्राण सोडले.
सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल -
मयत शंकर भोसले यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारी वरुन पती संदीप वडजेसह माधुरीच्या सासरच्या पाच जणांना विरोधात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : प्रियकराने फसवल्याने प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या, आरोपीस अटक