ETV Bharat / state

अवघ्या तीन दिवसांवर लग्न; खरेदीसाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू - nanded road accident

राजू शेषराव वाळके (22) असे मृत नवरदेवाचे नाव असून, अवघ्या तीन दिवसांवर लग्न येवून ठेपले होते. हळद लागण्यापूर्वीच काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नवरदेवाचा अपघातात मृत्यू
नवरदेवाचा अपघातात मृत्यू
author img

By

Published : Apr 24, 2021, 7:10 PM IST

नांदेड - हिमायतनगर शहरात लग्नाची खरेदी करून गावाकडे जाणाऱ्या नवरदेवाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता खडकी फाटा येथे ही घटना घडली. राजू शेषराव वाळके (22) असे मृत नवरदेवाचे नाव असून, अवघ्या तीन दिवसांवर लग्न येवून ठेपले होते. हळद लागण्यापूर्वीच काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील घटना...!
हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील राजू शेषराव वाळके या २२ वर्षीय तरूणाचा २७ एप्रिल रोजी विवाह निश्चित झाला होता. कुटूंबामध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. स्वतः नवरदेव राजू हा काही किरकोळ खरेदीसाठी एम. एच. २६ बी. के. ३३९२ या दुचाकीने हिमायतनगर येथे गेला होता. सामान खरेदी करून तो गावाकडे परतत असताना त्याची दुचाकी एका नंबर नसलेल्या दुचाकीला पाठीमागून धडकली. या अपघातात नवरदेव राजू हा गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या नंबर नसलेल्या दुचाकीवरील श्रीगणेश कलाले (२४) व विनोद वांगे (२०, रा. खडकी बाजार) हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या तीन दिवस आधीच नवरदेवाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.