नांदेड: आगामी विधानसभा, जिल्हा ग्रामपंचायतींच्या निवडणुकींना परिषद निवडणुकांची रंगीत तालीम असलेल्या डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १८१ सुरुवात झाली आहे. शासनाने प्रत्येक उमेदवार आणि सरपंचांना निवडणुकीत सदस्य संख्येनुसार खर्च करण्याची मर्यादा घालून दिली आहे. त्यापेक्षा अधिकचा खर्च केल्यास मात्र विजयी होऊनही ते उमेदवाराच्या अंगलट येणार आहे. निवडणूक विभागाकडून प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांवर खर्चाची मर्यादा घालून देण्यात येते आहे. निवडणुकीच्या धामधुमीत खर्चाचा ताळमेळ लावताना अनेक उमेदवारांना चांगलाच घाम फुटतो. त्यासाठी खास कार्यकर्तांच नेमला जातो.
राजकारण तापणार: सरपंचाची आता थेट निवड होणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून राजकारण तापणार आहे. जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.
कागदावरचा अन् प्रत्यक्षातील खर्च वेगळा: कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांवर खर्चाची मर्यादा घालण्यात येते. परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने उमेदवारांकडून खर्च केला जातो. खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी तैनात असतात. परंतु त्यांच्या डोळ्यातही धूळफेक करण्यात येते. जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे.
खर्चाची मर्यादा ओलांडल्यास अपात्रतेची कारवाई: ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना खर्च किती करावा याबाबत अट घालून देण्यात आली आहे. चहापासून ते सभेतील खुर्च्या यांसह प्रत्येक बाबीचे दर ठरवून देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचार काळात खर्च करताना उमेदवारांना विशेष काळजी घ्यावी लागते. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास निवडून आल्यानंतरही उमेदवारावर अपात्रतेची कारवाई केली जाते. खर्चाची मर्यादा कोणाला किती? सदस्यसंख्या, खर्चमर्यादा (थेट सरपंच) खर्चमर्यादा (सदस्य), ७ व ९.50000 २५०००, ११ व १३ 100000. ३५०००, १५ व १७ १७५०००. 50000, नांदेड: ७, धर्माबाद: ३, अर्धापूर: २, उमरी: १, भोकर: ३, बिलोली: ९, मुदखेड १, नायगाव: ८, हदगाव: ६, मुखेड: १५, हि. नगर: १, कंधार: १६, किनवट: ५३, लोहा: २८, माहूर: २७.