नांदेड : तेलंगणा राज्याची आणि तेथील पदाधिकाऱ्यांची राजकीय मनोभूमिका आणि महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांची सीमावर्ती भागाबाबत असलेली भूमिका याबाबत उघड चर्चा करण्यात आली. यावेळी देगलूरचे समन्वयक तात्या देशमुख यांनी राजकीय पक्ष आणि या चळवळीचा संबंध कितपत योग्य अशी भूमिका घेतली.
काहीही संबंध नाही : समन्वयक गोविंद मुंडकर यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, तेलंगाना येथील भारत राष्ट्र समिती आणि प्रश्न सीमावर्ती भागाची चळवळ याचा काहीही संबंध नाही. भारत राष्ट्र समिती ही आता स्थापन झाली आणि ही चळवळ 2018 पासून सुरू आहे. तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीचा आणि प्रश्न सीमावर्ती भागाचे चळवळ आणि समन्वयकाचा काहीही संबंध नाही.
संयुक्त महाराष्ट्राची भूमिका : तुमचे समन्वयक तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याशी संपर्कात आहेत का?आमच्या विकासाबाबत तेलंगणाचे पदाधिकारी विचारणा करत असल्यास यात गैर ते काय? असेही मुंडकर यांनी स्पष्ट केले. आमची भूमिका संयुक्त महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रात राहून सीमा भागातील विकास घडावा ही मूळ भूमिका आहे. महाराष्ट्र हा मुंबई आणि पुण्यापुरता मर्यादित नाही. हे सुद्धा यावेळी ठणकावून सांगण्यात आले. मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाच्या धर्तीवर तेलंगाना सीमावरती भागातील विकास मंडळ स्थापन करून विकास घडवून आणावा, अशी आमची मागणी आहे.
हेही वाचा : Minor Girl Rape Case Nagpur: लिव्ह-इन पार्टनरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक