ETV Bharat / state

कोरोनावर औषध मिळाले, मात्र 25 वर्षात केळीच्या करपा रोगावर नाही; ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - ETV Bharat special report

करोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून, शास्त्रज्ञांनी प्रतिबंधात्मक लसीचा शोध लावला आहे. पण गेल्या पंचवीस वर्षात कृषी विद्यापीठ, केळी स़ंशोधन केंद्राला व संशोधकांना केळीवर पडणाऱ्या करपा रोगावर प्रभावी असे औषध शोधण्यास यश आले नाही. सध्या अर्धापूर तालुक्यातील व परिसरातील केळीच्या बागांना व्हायरसची बाधा होत आहे. या बागा रात्रीतून पिकतात. याचा परिणाम केळीच्या भावावर झाला आहे. याबाबतचा ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

केळी बाग
केळी बाग
author img

By

Published : Sep 20, 2021, 10:11 AM IST

Updated : Sep 20, 2021, 2:17 PM IST

नांदेड - जगभरातील नागरीक करोनामुळे त्रस्त झाले असून, शास्त्रज्ञांनी प्रतिबंधात्मक लसीचा शोध लावला आहे. पण गेल्या पंचवीस वर्षात कृषी विद्यापीठ, केळी स़ंशोधन केंद्राला व संशोधकांना केळीवर पडणाऱ्या करपा रोगावर प्रभावी असे औषध शोधण्यास यश आले नाही. सध्या अर्धापूर तालुक्यातील व परिसरातील केळीच्या बागांना व्हायरसची बाधा होत आहेत. या बागा रात्रीतून पिकतात. याचा परिणाम केळीच्या भावावर झाला आहे. भाव निम्म्याने कमी झाले आहेत. या रोगाची फळ पिक विम्यासाठी नोंद नसल्याने विम्याचा लाभ नाही, भाव नाही' व्यापारी केळी घेत नाहीत अशा तिहेरी स़ंकटात शेतकरी सापडला आहे. केळीचे घड शेतात सडून जाताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. दरम्यान, केळीचा लागवडीसाठी लागल़ेला खर्च निघने अवघड झाले आहे.

माहिती देताना केळी उत्पादक

१९९५ मध्य आला होता हा रोग

अर्धापूर तालुक्यात व परिसरातील गावांत केळीची लागवड क्षेत्र खूप मोठे आहे. राज्यात जळगाव नंतर नांदेड जिल्ह्यात केळीच्या बागा जास्त आहेत. या भागात १९९५ मध्ये करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला. केळीच्या बागा रात्रीतून पिकून गेल्या होत्या. तेंव्हापासून या भागात हा रोगाचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात होत असतो.

केळी बाग
केळी बाग

उत्पन्न तर नाहीच खर्च निघणेही अवघड

अर्धापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर केळीच्या बागांवर होत आहे. काढणीस आलेल्या बागेतील केवळ ३० ते ४० टक्के घड शेतकऱ्यांना विक्रीसाठी मिळत आहेत. या घडांनाही कमी भाव मिळत आहे. केळीला लागवडीसाठी खर्च खूप येतो. अशा परिस्थितीत उत्पन्न तर सोडाच लागवडीसाठी लागल़ेला खर्च निघनेही अवघड झाले आहे.

विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मनधरणी

केळीला स्थानिक पातळीवर बाजारपेठ नसल्याने व केळीच्या बागा पिकत असल्याने भाव कमी झाले आहेत. चांगल्या केळीला ८०० ते ९०० तर सर्व साधारण केळीला ४०० ते ६०० मिळत आहे. शेतकऱ्यांना केळीच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मनधरणी करावी लागत आहे.

केळी संशोधन केंद्राने काय संशोधन केले हाच संशोधनाचा विषय

केळीच्या विकाससाठी व संशोधधानासाठी (१९९६)मध्ये आंदोलन करण्यात आले होते. शासनाने केळी संशोधन केंद्र हे मंजूर करून नांदेड येथे कार्यरत केले. या संशोधन केंद्राने काय संशोधन केले हा एक संशोधनाचा विषय आहे. अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. तर, हवामान आधारित पीक विमा योजनेत या रोगाचा समावेश नसल्याने विम्याचा लाभ मिळत नाही अशा अनेक स़कटा शेतकरी सापडला आहे.

Last Updated : Sep 20, 2021, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.