नांदेड: तोंडाला दस्ती बांधून दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या. (Gangsters Vandalism of 25 vehicles) हा कारनामा येथील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेबाबत तीन संशयितांना विमानतळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Gangsters rampage in Hanumangarh)
25 गाड्यांची तोडफोड: शहरातील हनुमानगड कमान या पत्रकार कॉलनी या भागात आता मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झाली आहे. यात अनेकांकडे चारचाकी वाहनेसुद्धा आहेत. ज्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा नाही, अशा रहिवाशीकडून आपली वाहने घरासमोर लावली जातात. मात्र शनिवारी सकाळी आपली वाहने पाहून अनेकाना धक्का बसला. शुक्रवारी रात्री मुख्य रस्त्यावर असलेला शुकशुकाट पाहून तीन हल्लेखोरांनी घराच्या समोर उभ्या केलेल्या जवळपास 25 गाड्यांची तोडफोड केली. तोंडाला दस्ती बांधून दुचाकीवर आलेल्या या तिघांनी दगड मारून या वाहनांच्या समोरील भागाच्या काचा फोडल्या.
तीन युवक ताब्यात: घटनेबाबत १६ वाहनधारकांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे हनुमानगड परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर घटनेबाबत पोलिसांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर घटनेबाबत अज्ञात तीन युवकांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांची चौकशी करण्याचे काम सुरू होते. विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपींनी घटनेची कबुली दिली नाही अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक गौड़ यांनी दिली.
नागरिकांची मागणी: घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून या परिसरातील सीसीटीवी फुटेज गोळा केले आहेत. यात एका ठिकाणच्या सीटीव्हीत हल्लेखोर वाहनांच्या काचा फोडत असल्याचा कारनामा कैद झाला आहे. तोंडाला दस्ती बांधल्यामुळे अज्ञात चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले. सदर प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास लावून आरोपींना ताब्यात घ्यावे, अशी मागणी हनुमानगड व बेघर पत्रकार कॉलनी यांच्या वतीने करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची घटनास्थळी भेट दिली. मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी नगरसेवक आनंद चव्हाण यांनी निवेदन देत संबंधित हल्लेखोरांना पकडून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
काल (शनिवारी) रात्री दीडच्या दरम्यान हनुमानगड, श्रीराम नगर भागामध्ये अज्ञात गुंडांनी नागरिकांच्या 20 गाड्या फोडून दहशत निर्माण केली. ही येथील पहिलीच घटना आहे. यातून पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे दिसून येत आहे. -- स्थानिक नागरिक, हनुमानगड
हेही वाचा:
- Molested daughter In law : सुनेचा विनयभंग करणाऱ्या सासऱ्याला दहा वर्षांचा कारावास; दिरास दोन वर्षांची शिक्षा
- Udaipur Crime News : लज्जास्पद! विधवेला आधी मारहाण करून केस कापले, नंतर अर्धनग्न अवस्थेत बाजारात पळवले!
- Woman Body Found In Lodge: 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह लॉजमध्ये आढल्याने खळबळ, प्रियकर फरार