ETV Bharat / state

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न - प्रेयसी

प्रेयसीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात मंगळवारी घडली.

भाग्यनगर पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 14, 2019, 5:02 PM IST

नांदेड - प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने वारंवार अत्याचार केल्यानंतर लग्नाला नकार दिला. त्यामुळे हताश झालेल्या प्रेयसीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात मंगळवारी घडली. दरम्यान आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

भाग्यनगर पोलीस ठाणे

हदगाव तालुक्यातील २५ वर्षीय तरुणी नांदेडला श्रीनगर परिसरात शिकण्यासाठी राहते. सन २०१४ पासून शहरातील राजनगरमधील सुनील बापूराव लांडगे (वय ३२ )या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तू मला फार आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेल, असे म्हणून त्याने पीडितेवर तिच्या खोलीत, मैत्रिणीच्या खोलीत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला. नंतर त्याने तिच्यासोबत लग्न न करता दुसरीसोबत लग्न ठरवून फसवणूक केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. तसेच त्याने फोनवर तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितेले.

त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेचा जवाब नोंदवल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी सुनीलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. के. डमाळे तपास करत आहेत. आरोपी फरार झाला असून त्यास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

Intro:नांदेड - प्रियकराचा लग्नाला नकार; प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न.

नांदेड : प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने वारंवार अत्याचार केला आणि नंतर लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.Body:हदगाव तालुक्यातील रहिवासी असलेली 25 वर्षीय तरुणी नांदेडला श्रीनगर भागात शिकण्यासाठी राहते. सन 2014 पासून शहरातील राजनगर मधील सुनील बापूराव लांडगे (वय 32 )या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तू मला फार आवडतेस, मी तुझ्याशीलग्न करेल, असे म्हणून त्याने पिडितेवर तिच्या खोलीत, मैत्रिणीच्या खोलीत वारंवार अत्याचार केला. नंतर त्याने तिच्या सोबत लग्न न करता दुसरीसोबत लग्न ठरवून फसवणूक केली, तसेच त्याने फोनवर तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पीडित तरूणीने पोलिसांना दिलेल्या जबाणीत नमूद केले आहे.Conclusion:
ही घटना 12 मार्च 2019 रोजी घडली. तिला लगेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तिथे जाऊन पीडितेचा जवाब नोंदविल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी सुनीलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. के.डमाळे अधिक तपास करीत आहेत. आरोपी फरार झाला असून त्यास लवकरच अटक करण्यात येणार असल्याच पोलिसांनी सांगितले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.