ETV Bharat / state

मुकबधीर तरुणीवर बलात्कार करून दगडाने ठेचून खून; आरोपीला अटक - Girl Raped In nanded

मुकबधीर तरुणीवर बलात्कार करुन दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. आई-वडिलांचे छत्र हरवलेली एक 27 वर्षीय मुकबधीर तरुणी शहरातील नवी आबादीत असणाऱ्या आपल्या बहिणीकडे राहत होती.

नांदेड
नांदेड
author img

By

Published : Dec 10, 2020, 3:58 PM IST

नांदेड - बिलोली शहरातील नबी आबादी येथील मुकबधीर तरुणीवर बलात्कार करुन दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी ही घटना घडली. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला बिलोली पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरक्षक शिवाजी डोईफोडे यांनी दिली.

Girl Raped And Murdered In nanded
घटनास्थळाचा फोटो

आई-वडिलांचे छत्र हरवलेली एक 27 वर्षीय मुकबधीर तरुणी शहरातील नवी आबादीत असणाऱ्या आपल्या बहिणीकडे राहत होती. सदर बहिण मोलमजूरी करुन आपल्या मुकबधीर बहिणीची देखभाल करायची. 9 डिसेंबरला पीडितेची बहिण कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा आरोपीने पीडितेवर बलात्कार करून तीचा दगडाने ठेचून खून केला. पीडितेची बहिण सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर तिला आपली मुकबधीर बहीण घरात आढळून आली नाही. शोधाशोध घेतली असता, जिल्हा परिषद हायस्कुलच्या मागील काटेरी झुडपात पिडितेचा मृतदेह आढळला.

सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय -

पीडितेचा मृतदेह पाहताच बहिणीने अण्णाभाऊ साठे नगरमधील आपल्या भावाकडे धाव घेतली. बुधवारी रात्री बिलोली पोलीस ठाण्यात आरोपी साईनाथ राम निमोड याच्याविरोधात 302, 376 (2), 354, 354 (ड) भादविनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मध्यरात्री आरोपीला अटक केली. सदर प्रकरणात सामूहिक अत्याचार झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.

हेही वाचा - श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर मथुरा न्यायालयात गुरुवारी सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.