ETV Bharat / state

ऐन मकर संक्रातीला बालिकेचा खून; क्रूर मारेकऱ्यांनी कानातल्या बाळ्या ओरबाडल्या

Girl Murder In Nanded : नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय चिमुकली रविवारी बेपत्ता झाली होती. या बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सोमवारी सकाळी उमरी रोडवर आढळून आला आहे. या चिमुकल्या मुलीच्या कानातील बाळ्या मारेकऱ्यांनी ओरबडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुलीच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचंही यावेळी पोलिसांनी सांगितलं.

Girl Murder In Nanded
घटनास्थळावर दाखल झालेले पोलीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 10:21 AM IST

नांदेड Girl Murder In Nanded : ऐन मकर संक्रातीच्या दिवशी सहा वर्षीय चिमुकलीचा खून करण्यात आल्यानं नांदेड जिल्हा हादरला आहे. क्रूर मारेकऱ्यांनी या चिमुकलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या ओरडल्याचं मृतदेहावरुन स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुदखेड तालुक्यातील एका गावात ही घटना घडली असून चिमुकलीचा मृतदेह शहराजवळ उमरी रोडवर सोमवारी आढळून आला आहे. या बालिकेच्या डोक्यावर गंभीर जखम असल्यानं पोलिसांनी खुनाचा संशय वर्तवला आहे.

काय आहे प्रकरण : मुदखेड तालुक्यातील एक सहा वर्षीय चिमुकली हरवली होती. या चिमुकलीच्या हरवल्याची तक्रार रविवारी मुदखेड पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह शहरानजीक उमरी रोडवर सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचं पुढं आलं आहे. त्यामुळं मुलीचा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

सहा वर्षीय चिमुकली बेपत्ता : मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून रविवारी दुपारी सहा वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मुलगी कुठं आढळल्यास माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी 20 तासानं त्या बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह, रोही पिंपळगावपासून 15 किलोमीटर अंतरावर मुदखेड शहरालगत असलेल्या उमरी रोडवर आढळून आला. चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. सदर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांकडून तपास मोहीम राबवण्यात येत आहे. घटनास्थळी भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यावरुन

मुदखेड पोलिसांची घटनास्थळी धाव : घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुदखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक वसंत सप्रे, सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, चंद्रकांत पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. श्वान पथकाच्या मदतीनं शोध घेण्यात येत असून, चिमुकलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय नांदेड इथं पाठवण्यात आला आहे. सदरप्रकरणी पोलीस प्रशासनानं जलद गतीनं तपास करावा, अशी मागणी मुलीच्या नातेवाइकांकडून होत आहे.

मुलीच्या कानातील ओरबाडल्या बाळ्या : मृत चिमुकलीचे वडील हे मोलमजुरी करतात. रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ती बेपत्ता झाली होती. रात्री उशिरापर्यंत कुटूंबियांनी तिचा शोध घेतला. परंतू ती सापडली नव्हती. मध्यरात्री मुलीच्या कुटूंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांकडूनही शोध मोहीम सुरु करण्यात आली. सोमवारी सकाळी या मुलीचा मृतदेह आढळून आला असून तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या आरोपींनी ओरबाडल्या होत्या. तर चिमुकल्या मुलीच्या डोक्यावर गंभीर जखम दिसत असून हा खून असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा :

  1. सीईओ महिलेकडून बाळाचा खून ; मुलाच्या शवविच्छेदन अहवालातून उघड झाली 'ही' धक्कादायक माहिती
  2. क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीचा आढळला मृतदेह; डॉक्टर विरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.