ETV Bharat / state

पैनगंगा नदीवरील गांजेगाव पुलावर पाणी, विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला - गांजेगाव बंधाऱ्याचा पूल

मागील दोन वर्षांपूर्वी गांजेगाव पुलाच्या बंधाऱ्यावरून पाणी जात असल्याने परिसरातील गावकऱ्यांनी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली होती. मात्र, राजकीय नेते व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता पुलावरून पाणी वाहू लागले आहे.

पैनगंगा
पैनगंगा
author img

By

Published : Aug 20, 2020, 10:44 AM IST

नांदेड - हिंगोली, वाशिम जिल्ह्यात सातत्याने बरसणारा पाऊस तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे हिमायतनगर विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. विदर्भ प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा पाणी पातळीत वाढ होऊन गांजेगावच्या पुलावरून पाणी जात असल्याने ढाणकीमार्गे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी गांजेगाव पुलाच्या बंधाऱ्यावरून पाणी जात असल्याने परिसरातील गावकऱ्यांनी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली होती. मात्र, राजकीय नेते व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर बंधाऱ्यात १९ ऑगस्टला सकाळी ८ वाजता ७२.७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. बुलडाणा भागातील बंधाऱ्याचे पाणी येत असल्याने इसापूर धरणाचे कोणत्याही क्षणी दरवाजे उघडले जातील, असे विदर्भ प्रशासनाने जाहीर करून नदीकाठावरील गावकऱ्यांना आपली गुरे-ढोरे शेतीपयोगी सामान व नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - 'बाभळी'च्या बॅक वॉटरमुळे पिकांचे नुकसान; आठ वर्षांपासून मावेजा मिळेना

गांजेगाव बंधाऱ्याचा पूल उमरखेड प्रशासनाच्या अंतर्गत येतो. पुराचा धोका पाहता या पुलाची उंची वाढवावी, जेणेकरून पूरपरिस्थिती उद्भवल्यावर संभाव्य धोका टाळू शकेल, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.